आश्चर्यचकित व्हाल! फक्त ₹10,000 मध्ये मिळतेय Honda Activa, जाणून घ्या नवीन किंमती आणि EMI

दिवाळीपूर्वी Honda Activa स्कूटरची किंमत कमी! फक्त ₹10,000 डाउन पेमेंटमध्ये घरी आणा. जाणून घ्या EMI आणि ऑन-रोड किंमत तपशील.

Last updated:
Follow Us

Honda Activa: जीएसटी कमी झाल्यामुळे देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या Honda Activa स्कूटरच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. या दिवाळीत जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर आता हा सर्वोत्तम वेळ ठरू शकतो.

जीएसटी घटल्याने Activa झाली आणखी स्वस्त

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 350 सीसीपर्यंतच्या मोटरसायकल आणि स्कूटर्सवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी केला. यामुळे Honda Activa 6G ची किंमतही कमी झाली आहे. सध्या दिल्लीमध्ये या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹74,369 पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ₹87,693 पर्यंत जाते.

ऑन-रोड किंमत किती आहे?

Activa 6G चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल (STD) साठी एक्स-शोरूम किंमत ₹74,369 आहे. यात RTO चार्ज ₹6,450, इंश्युरन्स ₹6,773 आणि इतर खर्च ₹2,090 जोडले की ऑन-रोड किंमत सुमारे ₹89,682 होते.

फक्त 10 हजारात स्कूटर घरपोच

जर तुम्ही ₹10,000 डाउन पेमेंट करता, तर उर्वरित ₹79,682 साठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. 10% व्याजदराने 5 वर्षांसाठी लोन घेतल्यास, तुमची EMI फक्त ₹1,693 प्रतिमहिना येईल. या कालावधीत तुम्ही एकूण ₹21,898 व्याज भराल आणि स्कूटरची एकूण किंमत ₹1,11,580 इतकी होईल.  Diwali Bank Holidays येथे पाहून घ्या.

का घ्यावी Honda Activa?

Honda Activa ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर मानली जाते. उत्कृष्ट मायलेज, टिकाऊ इंजिन आणि कमी मेंटेनन्स खर्चामुळे ती शहरी तसेच ग्रामीण ग्राहकांची पहिली पसंती आहे. दिवाळी ऑफरमध्ये किंमत कमी झाल्यामुळे आता हा स्कूटर खरेदीसाठी उत्तम काळ आहे.

Vinod Kamble

My Name is Vinod Kamble, I Work as a Content Writer for MarathiGold and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel