Maruti Suzuki Fronx: दिवाळीपूर्वी जबरदस्त सवलत! आता किंमत झाली आणखी कमी

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सवर दिवाळीपूर्वी मोठी सवलत जाहीर! जाणून घ्या नवीन किंमती आणि ऑफर्सची संपूर्ण माहिती.

On:
Follow Us

Maruti Suzuki Fronx: दिवाळीच्या अगोदर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता हा सर्वोत्तम काळ आहे. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV ‘Fronx’ वर तब्बल ₹1.11 लाखांची सवलत जाहीर केली आहे. ही कपात 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाली असून, ग्राहकांना वेरिएंटनुसार ₹64,000 ते ₹1.11 लाखांपर्यंतचा फायदा मिळणार आहे.

नवीन किंमती आणि वेरिएंट्स

नवीन दरांनुसार मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची किंमत आता ₹6.85 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ₹11.98 लाखांपर्यंत जाते. ही कार मारुती सुझुकी बलेनो वर आधारित असून, नेक्सा रिटेल नेटवर्कद्वारे विकली जाते. बलेनोप्रमाणेच फ्रॉन्क्सनेही कंपनीच्या विक्रीत मोठा हातभार लावला आहे.

कोणत्या वेरिएंटला किती फायदा?

Sigma MT व्हेरिएंटची किंमत आता ₹6.85 लाख झाली आहे, जी पूर्वी ₹7.59 लाख होती — म्हणजे ₹74,000 ची कपात. Delta MT ला ₹80,000, तर टॉप व्हेरिएंट Alpha Turbo AT ला सर्वाधिक ₹1.11 लाखांची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीमुळे आता फ्रॉन्क्स अधिक स्पर्धात्मक दरात उपलब्ध झाली आहे.

दमदार फीचर्स आणि मायलेज

फ्रॉन्क्समध्ये 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 99 बीएचपी पॉवर आणि 147.6 एनएम टॉर्क देते. या इंजिनमुळे कारला 21.5 किमी/लीटर इतका उत्कृष्ट मायलेज मिळतो. गाडीमध्ये 9-इंच एचडी टचस्क्रीन, ड्युअल-टोन इंटीरियर, तसेच 360-डिग्री कॅमेरा असे प्रीमियम फीचर्स दिले आहेत. त्यामुळे या फेस्टिव सीझनमध्ये ग्राहकांसाठी ही डील अत्यंत आकर्षक ठरत आहे. इतर कार न्यूज देखील marathigold वर तुम्ही वाचू शकता.

फ्रॉन्क्स खरेदी करण्याचा योग्य काळ

जीएसटी 2.0 नंतरच्या किंमतकपातीमुळे फ्रॉन्क्स आता मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी अधिक परवडणारी झाली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ही ऑफर घेणे म्हणजे ‘डबल फायदा’ ठरेल.

Vinod Kamble

My Name is Vinod Kamble, I Work as a Content Writer for MarathiGold and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel