Lek Ladki Yojana 2025: महाराष्ट्र सरकारने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेतून मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. पण ही योजना नेमकी कशी आहे? अर्ज कुठे करायचा? पात्रता निकष काय आहेत? हे जाणून घेणे प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचे आहे.
लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे:
- मुलींचा जन्मदर वाढवणे
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे
- बालविवाह रोखणे
- कुपोषण कमी करणे
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे
राज्यातील मुलींच्या सशक्तीकरणासाठी ही योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेतून किती आर्थिक मदत मिळेल?
मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते:
- जन्मानंतर – 5 हजार रुपये
- इयत्ता 1 ली – 6 हजार रुपये
- इयत्ता 6 वी – 7 हजार रुपये
- इयत्ता 11 वी – 8 हजार रुपये
- वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – 75 हजार रुपये
अशाप्रकारे एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ मुलीला मिळतो.
लेक लाडकी योजनेतील अटी आणि पात्रता
- योजना फक्त पिवळ्या व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांसाठी लागू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना लाभ मिळणार
- एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी पात्र राहील
- लाभ मिळवण्यासाठी पालकांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
- दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी मुले झाल्यास दोन्ही मुलींना योजना लागू
- लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक
- वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे
- मुलीचे वय 18 वर्षांनंतर विवाह झालेले नसावे
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- मुलगी व पालकांचे आधार कार्ड (Aadhaar Card)
- बँक पासबुकची प्रत
- रेशनकार्ड (Ration Card)
- मतदान ओळखपत्र (Voter ID)
- शाळेचा दाखला (School Certificate)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अविवाहित असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल?
- ग्रामीण व नागरी भागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व महिला व बालविकास कार्यालय येथे अर्ज उपलब्ध असतील.
- अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांकडून अर्ज व कागदपत्रे स्वीकारतील.
- अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मंजुरी
- अर्ज स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद झाल्यानंतर भरला जाईल.
- अपूर्ण अर्जदारांना 15 दिवसांत कळवले जाईल.
- अर्ज पूर्ततेसाठी 1 महिना आणि वाढीव 10 दिवसांची मुदत मिळेल.
- ग्रामीण भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) तर शहरी भागात प्रकल्प अधिकारी (नागरी) अर्ज तपासून जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्याकडे पाठवतील.
- अंतिम मंजुरी जिल्हा कार्यक्रम अधिकारी करतील.
- लाभार्थ्यांच्या खात्यात थेट DBT द्वारे रक्कम जमा होईल.
स्थलांतर झाल्यास काय होईल?
- राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास पुढील लाभासाठी स्थानिक अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
- दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यास पुढील लाभ मिळवण्यासाठी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा.
पालकांसाठी महत्वाची माहिती
लेक लाडकी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे वेळेत सादर करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलींच्या शिक्षणावर लक्ष देत शाळेत सतत हजेरी ठेवणे गरजेचे आहे. तसेच कुटुंब नियोजनाच्या अटी पाळणे बंधनकारक आहे. या योजनेतून मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी आणि करिअर घडवण्यासाठी मोठा आधार ठरू शकतो.
आजच्या काळात मुलींचे शिक्षण आणि सुरक्षितता हीच खरी गुंतवणूक आहे. पालकांनी या योजनेचा लाभ घेऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य योजना आखावी. ही रक्कम फक्त आर्थिक मदत नसून मुलींच्या आत्मनिर्भरतेसाठी एक भक्कम पाया आहे.
डिस्क्लेमर
या लेखात दिलेली माहिती शासकीय दस्तऐवजांवर आधारित आहे. योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक महिला व बालविकास विभागाकडून अद्ययावत माहिती घ्यावी.









