भारतामध्ये Omega Seiki Mobility (OSM) ने जगातील पहिला ऑटोनॉमस (बिना ड्राइवर वाला) इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ‘स्वयंगती’ सादर करत नवा इतिहास घडवला आहे. केवळ 4 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणारा हा वाहन मॉडेल व्यावसायिक वापरासाठी तयार आहे.
स्वयंगतीची खासियत
‘स्वयंगती’ हे OSM च्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले असून त्यामध्ये AI-आधारित ऑटोनॉमी सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. हे वाहन एअरपोर्ट, स्मार्ट कॅम्पस, इंडस्ट्रियल पार्क, गेटेड कम्युनिटी तसेच गजबजलेल्या शहरी भागांमध्ये शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्टसाठी ड्रायव्हरशिवाय सहज चालू शकते. या गाड्यांना पूर्वनियोजित मार्गावर मॅप करून सेट केले जाते, ज्यामुळे प्रवास सुरक्षित आणि अडथळामुक्त होतो.
गेम-चेंजर का मानला जातोय हा प्रकल्प?
McKinsey च्या 2025 च्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत जागतिक ऑटोनॉमस वाहन बाजारपेठ 620 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होईल. या पार्श्वभूमीवर ‘स्वयंगती’ भारताचे असे पहिले उत्पादन आहे जे या वाढत्या ट्रेंडमध्ये फक्त सामील होत नाही, तर नेतृत्व करण्याची क्षमता दाखवते. भारतासारख्या देशात, जिथे ट्रॅफिक आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी मोठी समस्या आहे, तिथे ही तंत्रज्ञानाधारित सोय सुरक्षित व परवडणारी ठरू शकते.
कंपनीच्या संस्थापकांचे मत
OSM चे संस्थापक आणि चेअरमन उदय नारंग म्हणाले की, स्वयंगतीचे लॉन्च हे फक्त उत्पादन नाही तर भारताच्या वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी दिशा दाखवणारे महत्त्वाचे पाऊल आहे. आता ऑटोनॉमस वाहन ही केवळ कल्पना नसून काळाची गरज आहे. हे दाखवते की AI आणि LiDAR सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर भारतातही परवडणाऱ्या किमतीत होऊ शकतो.
OSM चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विवेक धवन यांनी स्पष्ट केले की, आमचा उद्देश ऑटोनॉमीला सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा आहे. स्वयंगतीने दाखवून दिले आहे की इलेक्ट्रिक वाहन उद्योगात इंटेलिजंट सिस्टीम्स आता रोजच्या मोबिलिटीमध्ये सहज समाविष्ट होऊ शकतात.
पायलटपासून प्रॉडक्शनपर्यंतचा प्रवास
स्वयंगतीने अलीकडेच 3 किमी लांबीचा ऑटोनॉमस रूट टेस्ट पूर्ण केला ज्यामध्ये 7 स्टॉप्स, रिअल-टाइम अडथळा ओळख आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी यांचा समावेश होता. ही संपूर्ण चाचणी ड्रायव्हरशिवाय करण्यात आली. कंपनी आता Phase-2 अंतर्गत या वाहनाचे व्यावसायिक रोलआउट करण्याच्या तयारीत आहे.
‘मेड-इन-इंडिया’ मोबिलिटीचा नवा अध्याय
4 लाखांच्या परवडणाऱ्या किंमतीत आणि ‘मेड-इन-इंडिया’ टॅगसह स्वयंगती केवळ ऑटो इंडस्ट्रीचे भविष्य बदलण्याची क्षमता दाखवत नाही तर भारताला जगातील ऑटोनॉमस मोबिलिटी लीडर्समध्ये स्थान मिळवून देऊ शकते.














