महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू झालेली लाडकी बहिण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी August 2024 मध्ये मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला; मात्र अंमलबजावणीदरम्यान अनेक अनियमितता समोर आल्या. काही पुरुषांनी खोटी कागदपत्रे लावून नावे नोंदवली, तर काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही पात्रता नसतानाही लाभ घेतल्याची प्रकरणे उघड झाली.
सरकारचे नवे पाऊल
या फसवणुकीवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता ई-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “खऱ्या पात्र महिलांनाच लाभ मिळावा आणि पारदर्शकता राखली जावी, यासाठी प्रत्येक लाभार्थीने ई-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे.”
किती वेळेत करावे ई-KYC?
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन शासनाने लाभार्थींना 2 महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र हा कालावधी संपल्यानंतर ई-KYC न केलेल्या महिलांचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-KYC करण्याची सोपी पद्धत
ऑनलाइन पर्याय : अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉगिन करून प्रक्रिया सुरू करा.
CSC केंद्र : जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनही ई-KYC करता येईल.
आवश्यक कागदपत्रे : नाव, पत्ता, आधार क्रमांक, रेशन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा यांची डिजिटल प्रत अपलोड करा.
संकेतस्थळावर ई-KYC साठी विशेष पॉपअप विंडो उपलब्ध होईल, त्यावरून नोंदणी पूर्ण करा.









