Mahindra New Price List Post GST: महिंद्रा अँड महिंद्रा ने जीएसटी दरातील सुधाराचा फायदा थेट ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या ICE SUV रेंजच्या नवीन एक्स-शोरूम किंमती जाहीर करताना मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. यात XUV3XO पासून Thar, Scorpio, Bolero, XUV700 अशा लोकप्रिय मॉडेल्सवर तब्बल लाखोंची बचत मिळणार आहे.
महिंद्राचा मोठा निर्णय
जीएसटी स्ट्रक्चरमध्ये सुधार लागू झाल्यानंतर महिंद्राने आपल्या SUV रेंजवर मोठी किंमत कपात केली आहे. कंपनीने जाहीर केलं आहे की या दरकपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना मिळेल. याशिवाय एक्स्ट्रा ऑफरमध्ये 1.29 लाख रुपये पर्यंतची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. अशा प्रकारे खरेदीदारांना Mahindra च्या गाड्या घेताना एकूण 2.56 लाख रुपये पर्यंत बचत होऊ शकते.
XUV3XO वर सर्वाधिक डिस्काउंट
Mahindra XUV3XO ची किंमत 1.56 लाख रुपयांनी कमी झाली असून आता याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.28 लाख रुपये आहे. यावर 90,000 रुपये फेस्टिव बेनिफिटसह ग्राहकांना एकूण 2.46 लाख रुपये बचत मिळणार आहे.
THAR खरेदीवर आकर्षक ऑफर
थ्री-डोअर Mahindra Thar वर 1.35 लाख रुपयांची किंमत कपात झाली आहे. आता ही SUV 10.32 लाख रुपयांपासून उपलब्ध असून 20,000 रुपये अतिरिक्त बेनिफिटसह खरेदीदारांना एकूण 1.55 लाख रुपये बचत होईल.
SCORPIO रेंजमध्ये जबरदस्त कपात
Mahindra Scorpio Classic ची किंमत 1.01 लाख रुपयांनी आणि Scorpio-N ची किंमत 1.45 लाख रुपयांनी घटली आहे. आता Scorpio Classic 12.98 लाख आणि Scorpio-N 13.20 लाख रुपये पासून सुरू होते. या दोन्हीवर अनुक्रमे 95,000 रुपये आणि 71,000 रुपये एक्स्ट्रा बेनिफिट मिळून ग्राहकांना 1.96 लाख आणि 2.15 लाख रुपये पर्यंत बचत मिळू शकते.
BOLERO आणि NEO वर मोठी सूट
महिंद्राच्या बेस्ट सेलिंग Bolero रेंजमध्ये 1.27 लाख रुपयांची किंमत कपात करण्यात आली आहे. आता याची सुरुवातीची किंमत 8.79 लाख रुपये आहे. यावर 1.29 लाख रुपये अतिरिक्त ऑफरसह एकूण 2.56 लाख रुपये पर्यंत बचत मिळू शकते.
THAR ROXX साठी नवीन किंमत
फाईव्ह-डोअर Mahindra Thar Roxx आता 1.33 लाख रुपये स्वस्त झाली असून तिची सुरुवातीची किंमत 12.25 लाख रुपये आहे. 20,000 रुपयांच्या एक्स्ट्रा ऑफरसह एकूण 1.53 लाख रुपये बचत शक्य आहे.
XUV700 वरही मोठा फायदा
फुल-साइज Mahindra XUV700 वर 1.43 लाख रुपयांची किंमत कपात झाली असून आता ही SUV 13.19 लाख रुपये पासून मिळेल. 81,000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरसह ग्राहकांना एकूण 2.24 लाख रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.
बाजारातील स्पर्धा वाढवण्याची तयारी
महिंद्राच्या मते, हा प्राइस कट ग्राहकांसाठी SUV खरेदी अधिक आकर्षक करेल आणि Thar, Scorpio-N, XUV700 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची मागणी आणखी वाढेल. SUV सेगमेंटमध्ये कंपनीची पकडही अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.















