DA Hike 8th Pay Commission: या वर्षीची दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार 8th Pay Commission संदर्भात निर्णायक पावले उचलण्याची तयारी करत आहे. यासोबतच Dearness Allowance (DA) वाढवण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. या दोन्ही निर्णयांचा थेट फायदा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मिळू शकतो.
महागाई भत्त्यात वाढीची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, October महिन्यात केंद्र सरकार DA मध्ये 3% वाढ जाहीर करू शकते. सध्या 55% असलेला महागाई भत्ता वाढून 58% होऊ शकतो. या वाढीचा थेट परिणाम 1.2 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी व पेन्शनर्सच्या पगार आणि पेन्शनवर होईल. दिवाळीपूर्वीचा हा दिलासा कुटुंबाच्या सणासुदीच्या खर्चाला हातभार लावणार आहे.
वर्षातून दोनदा DA सुधारणा
केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा DA मध्ये सुधारणा करते—पहिली जानेवारी-जून आणि दुसरी जुलै-डिसेंबर या कालावधीत. मार्च 2025 मध्ये जानेवारी-जून कालावधीसाठी DA मध्ये 2% वाढ झाली होती, ज्यामुळे तो 53% वरून 55% झाला. आता जुलै-डिसेंबर 2025 साठी 3% वाढ होण्याची चर्चा आहे. लागू झाल्यास सुमारे 1 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होईल.
पगार व पेन्शनवर थेट परिणाम
महागाई भत्ता हा बेसिक सैलरीवर आधारित असल्याने पगार आणि पेन्शनवर त्याचा थेट परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर पेन्शनरची बेसिक पेन्शन 9,000 रुपये असेल, तर 55% DA नुसार त्यांना 4,950 रुपये मिळतात. एकूण पेन्शन 13,950 रुपये होते. DA 58% झाल्यास रक्कम वाढून 5,220 रुपये होईल, म्हणजेच एकूण पेन्शन 14,220 रुपये होईल. यात 270 रुपयांचा फायदा मिळेल.
8th Pay Commission ची पुढील पावले
16 January 2025 रोजी केंद्र सरकारने 8th Pay Commission स्थापन करण्याची घोषणा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी या आयोगाचे Terms of Reference (ToR) निश्चित होऊ शकतात आणि आयोगाचे औपचारिक गठनही शक्य आहे. आयोगात 6 सदस्य असण्याची शक्यता असून 15–18 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचा कालावधी ठरू शकतो. मात्र, या वेळेस 8 महिन्यांत अहवाल देण्याचे लक्ष्य ठेवले जाऊ शकते, जेणेकरून 1 January 2026 पासून नवीन शिफारशी लागू करता येतील.









