Tata Upcoming Cars in India: टाटा मोटर्सने भारतीय SUV बाजारात आणखी पकड मजबूत करण्याची रणनीती आखली आहे. कंपनी येत्या काही वर्षांत 10 लाख रुपयांच्या आत तीन नवी SUV सादर करण्याच्या तयारीत असून 4-मीटर सेगमेंटवर लक्ष केंद्रीत करत आहे. या तिन्ही गाड्यांपैकी दोन मॉडेल्स पुढील तीन वर्षांत रस्त्यावर उतरणार आहेत. यातील पहिली SUV नोव्हेंबर 2025 मध्ये लॉन्च होणार आहे.
TATA PUNCH FACELIFT नोव्हेंबर 2025 मध्ये
टाटा मोटर्सची लोकप्रिय मायक्रो SUV Punch आता नव्या रूपात येत आहे. Tata Punch Facelift मध्ये अनेक आधुनिक फीचर्स असतील. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या 7.0 इंच स्क्रीनऐवजी 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले जाईल. तसेच 4 इंच ड्रायव्हर डिस्प्लेऐवजी मोठा डिजिटल पॅनल बसवला जाणार आहे. इंजिनच्या बाबतीत सध्याचा 1.2 लिटर पेट्रोल आणि पेट्रोल-CNG पर्याय कायम राहील. विशेष म्हणजे CNG व्हर्जन आता 5-स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) सह देखील उपलब्ध होऊ शकते, जे सध्या फक्त 5-स्पीड मॅन्युअलमध्ये येते.
2027 मध्ये नवीन TATA NEXON
भारताची सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV म्हणून ओळखली जाणारी Tata Nexon 2027 मध्ये सेकंड जनरेशन अवतारात येईल. कंपनीच्या अंतर्गत याचा कोडनेम ‘गरुड’ असा आहे. या नव्या Nexon मध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि पेट्रोल-CNG इंजिन असेल, मात्र 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात येणार नाही. प्रीमियम सेगमेंटला साजेशे फीचर्स जसे 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assist System) आणि पावर ड्रायव्हर सीट या गाडीत मिळणार आहेत. या फीचर्समुळे ही SUV आपल्या सेगमेंटमध्ये अधिक स्पर्धात्मक ठरेल.
TATA SCARLETT: दमदार ऑफ-रोड SUV
टाटा मोटर्सची नवी ऑफ-रोडिंग SUV Scarlett देखील चर्चेत आहे. मस्क्युलर लुक आणि रग्गेड परफॉर्मन्ससह डिझाइन केलेली ही SUV थेट Mahindra Thar आणि Maruti Suzuki Jimny ला टक्कर देऊ शकते. ऑफ-रोडिंगसाठी खास तयार केली जाणारी Scarlett केवळ लुक्समध्येच नव्हे तर रिअल परफॉर्मन्समध्येही जबरदस्त असेल. कंपनी ती पुढील काही वर्षांत सादर करण्याची शक्यता आहे.















