Investment Planning: महिन्याच्या शेवटी जर तुमच्या खात्यात काही पैसे शिल्लक राहत असतील, तर पहिलाच विचार डोक्यात येतो – हे पैसे कुठे ठेवावेत? बहुतांश लोक हे पैसे Savings Account मध्ये ठेवतात कारण तिथून कोणत्याही वेळी पैसे काढणे शक्य असते. पण हे खरोखरच सर्वोत्तम पर्याय आहे का?
SEVING ACCOUNT: सुरक्षित पण नफा कमी
Savings Account चा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची सुरक्षा आणि गरजेवेळी सहज पैसे काढता येतात. पण जिथे रिटर्नचा प्रश्न येतो, तिथे हा पर्याय मागे पडतो. बहुतांश बँकांमध्ये या खात्यावर फक्त 2.5% ते 3% पर्यंतच व्याज दिलं जातं, जे महागाईच्या दरासमोर खूपच कमी आहे.
LIQUID MUTUAL FUND: थोडा धोका, पण चांगला नफा
जर तुम्ही थोडा धोका पत्करू शकत असाल, तर Liquid Mutual Fund हा एक अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. हे फंड कंपन्यांना 90 दिवसांसाठी कर्ज देतात आणि त्या बदल्यात तुलनेत चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षांतील टॉप Liquid Funds ने 6% ते 7% पर्यंत वार्षिक रिटर्न दिला आहे, जो Savings Account च्या तुलनेत खूपच चांगला आहे.
₹1 लाखाच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती?
गुंतवणुकीचा पर्याय | रिटर्न दर | नफा | एकूण रक्कम |
---|---|---|---|
Saving Account | 2.5% | ₹2,500 | ₹1,02,500 |
Liquid Mutual Fund | 6% | ₹6,000 | ₹1,06,000 |
म्हणजेच फक्त योग्य पर्याय निवडून तुम्ही ₹1 लाख गुंतवणुकीवर ₹3,500 जास्त मिळवू शकता.
LIQUID FUND किती सुरक्षित आहेत?
Liquid Fund ही Mutual Fund ची सर्वात कमी रिस्क असलेली श्रेणी मानली जाते, तरीसुद्धा ते Savings Account इतके गॅरंटीड नसतात. बाजारातील चढ-उतार किंवा कंपनीच्या क्रेडिट रेटिंगमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम या फंड्सवर होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुमची गरज, धोका सहन करण्याची क्षमता आणि उद्दिष्टं ठरवणं आवश्यक आहे.
तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?
जर तुमचं प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण सुरक्षा आणि 24×7 पैसे उपलब्ध असणं असेल, तर Savings Account उत्तम आहे. पण जर तुम्ही थोड्या जास्त परताव्यासाठी थोडी रिस्क घेऊ शकत असाल आणि पैसे काही महिने लागणार नाहीत, तर Liquid Mutual Fund एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो. आणि हो, गुंतवणूक करण्याआधी एखाद्या वित्तीय सल्लागाराशी सल्ला घेणं हितावह ठरेल.
Disclaimer: या लेखातील माहिती फक्त शैक्षणिक हेतूसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधावा.