रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न आणि एकरकमी रक्कम मिळणं ही अनेकांची गरज असते, जेणेकरून पुढचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरळीत जावं. पण त्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे नियोजन करणं अत्यावश्यक आहे. जर वेळेवर नियोजन न केल्यास, मोठी पेन्शन किंवा एकरकमी रक्कम मिळवणं कठीण होऊ शकतं. अशा वेळी National Pension System (NPS) ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.
नेशनल पेन्शन सिस्टम म्हणजे काय?
National Pension System (NPS) ही एक पर्यायी निवृत्ती बचत योजना आहे, जी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) यांच्याकडून रेग्युलेट केली जाते. या योजनेत कामकाजाच्या काळात नियमित गुंतवणूक करता येते. जमा झालेल्या रकमेपैकी किमान 40% रक्कम annuity खरेदीसाठी वापरावी लागते, ज्यामुळे दर महिन्याला पेन्शन स्वरूपात नियमित उत्पन्न मिळतं.
उर्वरित 60% रक्कम निवृत्तीच्या वेळी एकरकमी स्वरूपात काढता येते. NPS मधील गुंतवणूक वयोमान आणि निवडलेल्या स्कीमनुसार debt आणि equity मध्ये वाटून केली जाते. त्यामुळे मिळणारा परतावा फिक्स नसून मार्केटशी संबंधित असतो.
NPS मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग
भारतीय नागरिक NPS योजनेअंतर्गत रिटायरमेंटनंतरच्या गरजांसाठी नियमित बचत करू शकतो. ही योजना PFRDA कडून चालवली जाते. यामध्ये Tier 1 आणि Tier 2 असे दोन प्रकारचे खाते उघडता येतात. Tier 1 हे प्राथमिक पेन्शन खाते असून, यामध्ये काही अटींसह पैसे काढता येतात. हेच खाते रिटायरमेंटसाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये गुंतवणुकीवर Income Tax Act च्या Section 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
NPS मधील गुंतवणुकीचे फायदे
NPS योजनेत गुंतवणुकीवर Section 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंतची कर सवलत मिळते. याव्यतिरिक्त, Section 80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त ₹50,000 ची सवलतही मिळू शकते. म्हणजे एकूण ₹2 लाखांपर्यंतची टॅक्स बचत करता येते.
₹5000 महिन्याची गुंतवणूक केल्यास किती पेन्शन मिळेल?
समजा तुम्ही दर महिन्याला ₹5000 गुंतवता आणि तुमचं वय सध्या 18 वर्षं आहे. तुम्ही Aggressive गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला अंदाजे 14% परतावा मिळतो. या परिस्थितीत, एकूण गुंतवणूक ₹25.2 लाख होईल. यावर ₹14.7 कोटींचा नफा मिळून एकूण मॅच्युरिटी व्हॅल्यू ₹14.95 कोटी होईल.
जर तुम्ही 40% हिस्सा annuity खरेदीसाठी वापरला, तर अंदाजे ₹3.29 लाख रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. आणि जर तुम्ही 20% tax slab मध्ये येत असाल, तर जवळपास ₹5.04 लाख रुपयांची कर बचत होऊ शकते.
Disclaimer: वरील लेखातील सर्व आकडेवारी अंदाजावर आधारित आहे. यामध्ये नमूद केलेले परतावे हे मार्केट परस्थितीनुसार बदलू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.