IRCTC: भारतीय रेल्वेने Tatkal तिकिट बुकिंगसंदर्भातील महत्त्वाचे नियम बदलले असून हे नवे नियम आजपासून म्हणजेच 15 जुलै 2025 पासून लागू झाले आहेत. आता Tatkal तिकिट बुक करताना आधार ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आले आहे. या बदलामुळे अनधिकृत तिकीट बुकिंगवर लगाम बसेल आणि सामान्य प्रवाशांना अधिक सुलभ सेवा मिळेल, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.
TATKAL तिकिटासाठी AADHAAR OTP आता अनिवार्य
Tatkal तिकिट बुक करताना प्रवाशाला त्याच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकणे आवश्यक आहे. जोपर्यंत हा OTP यशस्वीरीत्या व्हेरिफाय केला जात नाही, तोपर्यंत तिकिट बुकिंग पूर्ण होणार नाही. हा नियम IRCTC वेबसाइट, Rail Connect अॅप, ऑफलाइन PRS काउंटर आणि अधिकृत रेल्वे एजंट सर्वांवर लागू आहे.
TATKAL तिकिट कधी आणि कसे बुक करता येते?
| वर्ग | बुकिंग वेळ (ट्रेनच्या प्रस्थानाच्या दिवशी आधीचा दिवस) |
|---|---|
| AC क्लास (1A, 2A, 3A, CC, EC) | सकाळी 10:00 वाजता सुरू |
| Non-AC क्लास (SL, 2S) | सकाळी 11:00 वाजता सुरू |
यामध्ये प्रवाशांना फक्त एक दिवस आधी तिकिटे बुक करता येतात आणि तेही मर्यादित संख्येत उपलब्ध असतात.
ऑफलाइन बुकिंगवरही लागू होणार OTP व्हेरिफिकेशन
जर प्रवासी PRS काउंटर किंवा रजिस्टर रेल्वे एजंटमार्फत Tatkal तिकिट बुक करत असेल, तरीही आधार OTP आवश्यक आहे. या वेळी आधार क्रमांक आणि त्या आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक बुकिंग दरम्यान देणे अनिवार्य आहे.
IRCTC प्रोफाइलमध्ये आधार ऑथेंटिकेशन कसे करावे?
Tatkal तिकिट ऑनलाइन बुक करण्यासाठी तुमचे IRCTC खाते आधारसह प्रमाणीकृत असणे आवश्यक आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर लॉगिन करा
- ‘My Account’ सेक्शनमध्ये जा
- ‘Authenticate User’ वर क्लिक करा
- OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा
जर हे केले नाही, तर Tatkal तिकिट बुक करता येणार नाही.
एजंट बुकिंगसाठी वेळेची मर्यादा
सामान्य प्रवाशांना प्राधान्य मिळावे यासाठी अधिकृत एजंटच्या बुकिंग वेळेमध्येही कपात करण्यात आली आहे:
- AC क्लाससाठी एजंट सकाळी 10:00 ते 10:30 या वेळेत तिकिट बुक करू शकणार नाहीत
- Non-AC क्लाससाठी सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत एजंट बुकिंग बंद असेल
1 जुलैपासून रेल्वे तिकिटांचे दर वाढले
रेल्वेने 1 जुलै 2025 पासून राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस, दूरंतो, हमसफर यांसारख्या प्रीमियम आणि स्पेशल ट्रेन्सचे तिकिट दर वाढवले आहेत. हे दर प्रवासाचे अंतर आणि वर्गानुसार वेगळे आहेत.
आता चार्ट 8 तास आधी तयार होणार
रेल्वेने आरक्षण चार्टच्या वेळेतही बदल केला आहे. आता ट्रेनच्या प्रस्थानाच्या 8 तास आधी चार्ट तयार केला जाईल. उदाहरणार्थ, जर ट्रेन दुपारी 2 वाजेपूर्वी सुटत असेल, तर त्याचा चार्ट मागील रात्री 9 वाजता तयार होईल. यापूर्वी चार्ट 4 तास आधी तयार केला जात होता.
डिस्क्लेमर: वरील माहिती ही भारतीय रेल्वेने अधिकृतपणे जाहीर केलेल्या सूचनांवर आधारित आहे. प्रवाशांनी बुकिंगपूर्वी अधिकृत IRCTC वेबसाइट किंवा स्थानिक रेल्वे कार्यालयातून अंतिम आणि अद्ययावत माहिती घ्यावी.









