PM Kisan 20th installment date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने पाठवली जाते. सध्या या योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असून तो लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हप्ता मिळवण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
सरकारकडून सोशल मीडियावर दिला इशारा
केंद्र सरकारकडून सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी सूचना देण्यात आली आहे. संदेशात नमूद करण्यात आलं आहे की, “शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करत भारताची शेती समृद्ध करत आहोत. PM KISAN योजनेच्या 20व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आजच काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करा.” ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्त्याचे पैसे अडकू शकतात किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.
20वा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामं आवश्यक?
1. e-KYC पूर्ण करणे अनिवार्य
PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे. यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर OTP आधारित e-KYC करता येते. बायोमेट्रिक e-KYC साठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्या.
2. आधार आणि बँक खात्याची लिंकिंग
शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्याच्या सक्रिय बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. जर लिंक नसेल, तर हप्त्याचा पैसा खात्यात जमा होणार नाही.
3. बँक डिटेल्स तपासा
बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड योग्य आहेत का याची खातरजमा करा. चुकीची माहिती दिल्यास ट्रांजॅक्शन फेल होण्याची शक्यता असते.
4. जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी
जमिनीच्या नोंदीमध्ये काही चूक असल्यास किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील, तर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि ती दुरुस्त करा. अन्यथा आपली पात्रता रद्द होऊ शकते.
5. लाभार्थी स्टेटस तपासा
आपली पात्रता, मागील हप्त्यांची माहिती आणि अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
6. मोबाइल नंबर अपडेट ठेवा
जर आपला जुना मोबाइल नंबर अद्याप वेबसाईटवर असेल, तर OTP किंवा अन्य सूचना मिळणार नाहीत. त्यामुळे सद्याचा मोबाइल नंबर अपडेट करा.
PM Kisan वेबसाइटवर नंबर कसा अपडेट कराल?
- https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
- ‘Farmer Corner’ मध्ये जा
- ‘Update Mobile Number’ या पर्यायावर क्लिक करा
- आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका
- Captcha कोड भरा आणि ‘Submit’ वर क्लिक करा
- पुढील सूचनांनुसार मोबाइल नंबर अपडेट करा
ही सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास 20वा हप्ता मिळण्यास अडथळा येणार नाही. अन्यथा पैसे रोखले जाऊ शकतात किंवा लाभ नाकारला जाऊ शकतो.
20वा हप्ता केव्हा जाहीर होणार?
मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहारमधील मोतिहारी येथे दौऱ्यावर असतील. याच दिवशी ते पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचे वितरण करण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
DISCLAIMER:
वरील माहिती ही सरकारी संकेतस्थळे आणि विश्वसनीय मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत अपडेटसाठी pmkisan.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.









