Railway Employees Salary Hike: रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 7 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या एका सर्क्युलरनुसार, कोविड-19 लॉकडाऊनच्या दरम्यान घरी राहून ट्रेनिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम आता अधिकृतपणे ड्युटी म्हणून मान्य करण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा थेट लाभ मिळणार आहे.
सर्क्युलरमधील महत्त्वाचं स्पष्टिकरण
रेल्वे मंत्रालयाने 7 जुलै रोजी सगळ्या विभागीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्सना उद्देशून हे सर्क्युलर जारी केलं. या पत्रात स्पष्ट करण्यात आलं की, कोणताही रेल्वे कर्मचारी स्टायपेंडवर प्रशिक्षण घेत असेल किंवा नसेल, त्याचा ट्रेनिंग कालावधी ड्युटी म्हणूनच गृहित धरला जातो. यासंदर्भात पूर्वीही नियम अस्तित्वात होता, मात्र लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मंत्रालयाला पुन्हा स्पष्टीकरण द्यावं लागलं.
प्रश्न आणि उत्तरानंतर घेतलेला निर्णय
रेल्वे मंत्रालयाकडे एका विभागीय रेल्वे युनिटने प्रश्न उपस्थित केला होता – लॉकडाऊनमध्ये जे ट्रेनी घरी होते, त्यांचा कालावधी ड्युटी धरावा का? यावर उत्तर देताना मंत्रालयाने स्पष्ट केलं की होय, हा कालावधी ड्युटीमध्ये धरला जाईल आणि त्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना स्टायपेंड तसेच पगारवाढ देण्यात येईल.
2020 पासून लागू असलेली मार्गदर्शक तत्वं
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, मंत्रालयाने 2020 मध्येच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यानुसार कोविड लॉकडाऊनच्या काळात घरी असलेले ट्रेनी कर्मचारी देखील स्टायपेंडसाठी पात्र आहेत. मात्र एक अट होती – कोणताही ट्रेनी 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी राहू शकत नाही. ही अट जरी लागू असली तरी 6 महिन्यांपर्यंतचा कालावधी आता ड्युटी म्हणून गृहित धरला जाणार आहे.
पगारवाढीचा मार्ग खुला
मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं की, या प्रकरणाचा नव्याने आढावा घेण्यात आला आणि हे निष्कर्ष काढण्यात आलेत की कोविड लॉकडाऊनच्या दरम्यान 6 महिनेपर्यंत घरात असलेले ट्रेनिंग कर्मचारी आता ड्युटी मानले जातील. त्यामुळे त्यांच्या वेतनवाढीचा मार्ग खुला होतो. या निर्णयामुळे देशभरातील हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डिस्क्लेमर: या लेखातील माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सर्क्युलरवर आधारित आहे. नियम व अटी कालांतराने बदलू शकतात. अधिकृत माहिती व अद्ययावत माहितीसाठी संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट तपासावी.









