धूम उडवायला येतोय Vivo चा नवा स्मार्टफोन! कंपनी लाँच करणार V50 Elite Edition, डिटेल्स आल्या समोर

Vivo लवकरच V50 Elite Edition स्मार्टफोन लाँच करणार आहे. V50e मध्ये दमदार 5600mAh बॅटरी, 90W चार्जिंग, 50MP सेल्फी कॅमेरा आणि MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत.

On:
Follow Us

Vivo आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचा झपाट्याने विस्तार करत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने भारतीय बाजारात आपला लेटेस्ट Vivo V50e स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला होता. याआधी ब्रँडने Vivo V50 आणि Vivo V50 Lite हे दोन स्मार्टफोनही V50 सिरीज अंतर्गत सादर केले होते. आता कंपनी या मालिकेत आणखी एक जबरदस्त फोन जोडण्याच्या तयारीत आहे. एका प्रसिद्ध टिप्स्टरने ही माहिती शेअर केली आहे.

टिप्स्टर योगेश बरार यांनी X (एक्स) प्लॅटफॉर्मवर उघड केले आहे की, Vivo V50 Elite Edition लवकरच बाजारात येणार आहे. मात्र, टिप्स्टरने या फोनचे स्पेसिफिकेशन्स (Specifications) किंवा लाँच टाइमलाइन (Launch Timeline) याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. पुढील काही दिवसांत Vivo V50 Elite Edition विषयी आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या Vivo V50e मध्ये काय मिळते

या फोनमध्ये 6.77 इंच AMOLED Quad Curved Display आहे, ज्याचा स्क्रीन रिझोल्यूशन (Screen Resolution) 2392×1080 आहे. यामध्ये 120Hz Refresh Rate, 1800 निट्स लोकल पीक ब्राइटनेस (Local Peak Brightness), P3 Wide Color Gamut आणि 387 PPI स्क्रीन डेन्सिटी (Screen Density) मिळते. हा डिव्हाईस MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह सुसज्ज आहे आणि तो Android 15 आधारित FuntouchOS 15 वर चालतो.

फोनसाठी तीन Android OS अपग्रेड्स आणि 4 वर्षांचे Security Updates मिळणार आहेत. यात 8GB LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज (Storage) उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5600mAh बॅटरी आहे जी 90W FlashCharge ला सपोर्ट करते.

कॅमेरा विभागात, यामध्ये OIS (Optical Image Stabilization) सह 50MP Sony IMX882 मेन रिअर कॅमेरा आणि मागील बाजूस 8MP Ultra-Wide Angle Camera आहे. समोर 50MP Eye-F Group Selfie Camera दिला आहे.

फोनचे अन्य खास फिचर्स म्हणजे IP68/IP69 Rating, In-Display Optical Fingerprint Sensor, Dual Nano SIM, USB Type-C Port, Smart AI Features, भारतासाठी खास Wedding Portrait Studio, AI Aura Light Portrait 2.0, Underwater Photography, 8GB Extended RAM, Dual Stereo Speakers आणि SGS Low Blue Light Certification यांचा समावेश आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel