Samsung ने फेब्रुवारी महिन्यात आपला कमी किंमतीतला 5G स्मार्टफोन Galaxy F06 भारतात लॉन्च केला होता. हा स्वस्त 5G फोन 50MP कॅमेरा (50MP Camera) आणि 5000mAh बॅटरी (5000mAh Battery) सारख्या दमदार फीचर्ससह 4GB आणि 6GB RAM मध्ये सादर करण्यात आला होता.
आता ग्राहकांना खुश करत Samsung ने Samsung Galaxy F06 5G फक्त ₹7,999 च्या प्रारंभिक किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच 8 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये 5G फोन खरेदी करण्याची संधी आहे.
Samsung Galaxy F06 5G किंमत (Flipkart वर)
हा स्वस्त Samsung 5G फोन खरेदी करण्यासाठी Flipkart या ई-कॉमर्स साइटवर जावे लागेल. याठिकाणी Galaxy F06 5G सवलतीच्या दरात विकला जात आहे. Flipkart वर 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंट ₹7,999 मध्ये आणि 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट ₹8,499 मध्ये लिस्ट आहे. त्याचप्रमाणे 6GB RAM असलेला Galaxy F06 5G ₹9,799 मध्ये विक्रीस उपलब्ध आहे.
मॉडेल | लॉन्च किंमत | लिस्ट किंमत (Flipkart) | विक्री किंमत (Flipkart) |
---|---|---|---|
4GB + 64GB | ₹10,499 | ₹7,999 | ₹7,770 |
4GB + 128GB | ₹11,499 | ₹8,499 | ₹8,270 |
6GB + 128GB | ₹12,999 | ₹9,799 | ₹9,570 |
आकर्षक बाब म्हणजे Flipkart वर या फोनवर ₹229 ची अतिरिक्त सूट दिली जात आहे. ही सवलत सर्व व्हेरिएंट्सवर लागू आहे. त्यामुळे 4GB + 64GB वेरिएंट ₹7,770 मध्ये आणि 4GB + 128GB फक्त ₹8,270 मध्ये मिळतो. 6GB RAM असलेला 5G फोन ₹9,570 मध्ये खरेदी करता येईल.
Samsung India च्या अधिकृत वेबसाइटवर मात्र 4GB + 128GB वेरिएंट ₹11,499 मध्ये आणि 6GB + 128GB वेरिएंट ₹12,999 मध्ये विकला जात आहे. लक्षात घ्या की Flipkart वरून खरेदी करताना ₹29 ची Secured Packaging Fee भरावी लागते, जी या फोनसाठीही लागू आहे.
Samsung Galaxy F06 5G स्पेसिफिकेशन्स
स्क्रीन: Galaxy F06 5G फोनमध्ये 6.74-इंच HD+ डिस्प्ले (HD+ Display) दिला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट (90Hz Refresh Rate) सपोर्ट करतो. यामध्ये 800nits ब्राइटनेस मिळतो. मात्र, हे वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असून पंच-होल डिस्प्लेचा अभाव जाणवतो.
परफॉर्मन्स: हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे आणि यात 4 वर्षांचे OS Updates आणि 4 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स दिले जातील. यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर (MediaTek Dimensity 6300 Processor) देण्यात आला आहे, जो 6nm फॅब्रिकेशनवर तयार असून 2.4GHz क्लॉक स्पीड वर काम करतो. कंपनीच्या मते, याचा AnTuTu स्कोअर 4 लाखांहून अधिक असेल.
मेमरी: फोनमध्ये 4GB आणि 6GB RAM ऑप्शन्स असून, यामध्ये Extended RAM Technology आहे. 4GB RAM मध्ये 4GB व्हर्चुअल RAM मिळून एकूण 8GB RAM तर 6GB मध्ये 6GB व्हर्चुअल RAM मिळून एकूण 12GB RAM ची ताकद मिळते. यामध्ये 128GB इंटरनल स्टोरेज (128GB Storage) दिले आहे.
कॅमेरा: Galaxy F06 5G च्या मागील बाजूस Dual Rear Camera Setup आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा (50MP Main Camera) आणि 2MP Depth Sensor आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा (8MP Front Camera) दिला आहे.
बॅटरी: Samsung च्या या स्वस्त 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी (5000mAh Battery) दिली आहे. यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट (25W Fast Charging) आहे, परंतु 25W चार्जर फोनच्या बॉक्समध्ये मिळणार नाही, तो वेगळा खरेदी करावा लागेल.
खास फीचर्स: Galaxy F06 5G मध्ये 12 5G Bands दिले गेले आहेत, जे Jio, Airtel आणि Vi नेटवर्कवर उत्तम चालतील. यात Quick Share फीचर आणि Side Mounted Fingerprint Sensor देखील देण्यात आला आहे, जो डिव्हाइसच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे.