भारतामध्ये नुकताच लॉन्च झालेल्या Oppo K13 नंतर आता कंपनी त्याचा अपग्रेडेड व्हर्जन Oppo K13 Turbo चीनमध्ये सादर करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा केवळ साधा अपग्रेड नाही.
लीक झालेल्या एका हँड्स-ऑन इमेजमधून हे समोर आलं आहे की या फोनमध्ये ऍक्टिव्ह कूलिंग फॅन आणि RGB लाइटिंग दिली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य खास करून गेमर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. चला, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
Oppo K13 Turbo लीक माहिती
लीक इमेजमध्ये फोनच्या मागील भागात RGB लाइट्ससोबत एक मिनी फॅन दिसत आहे. हा एक असा फिचर आहे जो सामान्यतः मिड-रेंज (mid-range) स्मार्टफोनमध्ये दिसत नाही.
फोनचा हा डिझाईन केवळ “Turbo” ब्रँडिंगला साजेसा नाही, तर तो थर्मल परफॉर्मन्सच्या दृष्टीनेही नवीन मापदंड ठरवतो.
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 SoC ही चिपसेट दिली जाऊ शकते. ही एक 4nm ऑक्टा-कोर चिप असून ती Adreno 825 GPU सह येण्याची शक्यता आहे.
8s Gen 4 प्रोसेसर हा Snapdragon 8 Gen 3 च्या तुलनेत किंचित स्वस्त श्रेणीत येतो, पण तरीही हा प्रोसेसर दमदार हाय-पर्फॉर्मन्स देण्यास सक्षम आहे.
Oppo K13 Turbo इतर तपशील
फोनच्या डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि किंमतीबाबत अजून अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. मात्र हे निश्चित आहे की Oppo K13 Turbo मिड-रेंज सेगमेंटमध्ये काहीतरी नविन घेऊन येऊ शकतो.
भारतात लॉन्च झालेल्या K13 ची सुरुवातीची किंमत ₹17,999 आहे, आणि असे मानले जात आहे की K13 Turbo हा यापेक्षा किंचित प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
ऍक्टिव्ह कूलिंग फॅन संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. याला Oppo चा पहिला फॅन-कूल्ड फोन मानले जात आहे.
सध्या या फोनचे लॉन्चिंग केवळ चीनमध्ये होण्याची शक्यता आहे, पण याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास याचे ग्लोबल लॉन्च देखील होऊ शकते, असे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, हा डिव्हाइस iQOO Z10 Turbo Pro आणि Redmi Turbo 4 Pro यांसारख्या स्मार्टफोन्सना स्पर्धा देऊ शकतो. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा Oppo च्या या आगामी फोनची किंमत आणि परफॉर्मन्स वापरकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील.