Redmi Turbo 4 Pro Launched: Redmi ने अखेर आपला पॉवरफुल स्मार्टफोन Redmi Turbo 4 Pro लाँच केला आहे. कंपनीने हा फोन सध्या आपल्या होम मार्केटमध्ये म्हणजेच चीनमध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम (Qualcomm) च्या ताकदवान ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे, जो 16GB पर्यंत रॅमसोबत जोडलेला आहे.
फोटोग्राफीसाठी (Photography) या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन रिअर कॅमेरा देण्यात आला असून, सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागील बाजूस “Soft Mist Glass” बॅक कव्हर देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन Triple IP Rating – IP66+IP68+IP69 सह येतो, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून पूर्णतः सुरक्षित आहे.
यामधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी. या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंगसह 7550mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतक्या पॉवरफुल स्मार्टफोनची किंमत किती असेल? चला जाणून घेऊया या फोनची संपूर्ण माहिती…
Redmi Turbo 4 Pro ची किंमत किती आहे?
चीनमध्ये Redmi Turbo 4 Pro चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट CNY 2,199 (अंदाजे ₹25,700) पासून सुरू होतो. याचा 16GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला पर्याय CNY 2,299 (अंदाजे ₹26,900) मध्ये उपलब्ध आहे.
12GB+512GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,499 (अंदाजे ₹29,300) आहे, तर 16GB+512GB वर्जनची किंमत CNY 2,699 (अंदाजे ₹31,600) आहे. याचबरोबर 16GB+1TB वर्जनसाठी CNY 2,999 (अंदाजे ₹35,100) मोजावे लागतील. हा फोन Black, Green आणि White कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
याशिवाय, Redmi Turbo 4 Pro Harry Potter Edition ही आणखी एक खास आवृत्ती 16GB+512GB व्हेरिएंटमध्ये CNY 2,799 (अंदाजे ₹32,800) मध्ये सादर करण्यात आली आहे. हे सर्व व्हेरिएंट सध्या चीनमध्ये Xiaomi च्या अधिकृत ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Redmi Turbo 4 Pro चे खास स्पेसिफिकेशन्स
नवीन Redmi Turbo 4 Pro मध्ये 6.83 इंचांचा 1.5K (1280×2800 pixels) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 120Hz Refresh Rate, 3200 nits Peak Brightness, 3840Hz PWM Dimming आणि Dolby Vision चा सपोर्ट आहे. हा फोन 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 4 चिपसेटवर कार्यरत असून, 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह येतो. हा फोन Android 15 बेस्ड HyperOS 2 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये Sony LYT-600 प्रायमरी सेंसर दिला आहे जो 50MP (1/1.95 इंच) आहे आणि OIS, EIS आणि f/1.5 aperture सह येतो. त्याचबरोबर, यात f/2.2 aperture असलेला 8MP Ultra-Wide Camera देखील आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 aperture असलेला 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये 90W Wired Charging Supportसह 7550mAh ची बॅटरी आहे, शिवाय 22.5W Reverse Fast Charging चाही सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, Galileo, GLONASS, NavIC, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
Triple IP Rating – IP66+IP68+IP69 मुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. यामध्ये In-display Optical Fingerprint Sensor आणि Infrared Transmitter देखील आहे, ज्याद्वारे घरातील इतर स्मार्ट डिव्हाइसेस नियंत्रित करता येतात. या फोनचे वजन 219 ग्रॅम असून, डाइमेंशन 163.1×77.93×7.98mm आहे, म्हणजेच याची जाडी फक्त 7.98mm आहे.