भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये Motorola ची उपस्थिती झपाट्याने वाढत आहे. मागील दोन आठवड्यांत कंपनीने Motorola Edge 60 Fusion आणि Edge 60 Stylus हे दोन मोबाईल भारतात सादर केले आहेत आणि आता कंपनीचा तिसरा स्मार्टफोन देखील येण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, Motorola Edge 60 Pro भारतात लाँच होणार असून हा नवीन 5G स्मार्टफोन 30 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहे.
Motorola Edge 60 Pro भारतात लॉन्च होणार कधी?
Motorola Edge 60 Pro 5G हा फोन 30 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होईल. कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की, ‘Edge 60’ सिरीजमधील हा तिसरा मोबाईल फोन एप्रिल अखेरीस भारतीय बाजारात दाखल होणार आहे. याच दिवशी या स्मार्टफोनची किंमत (Price) उघड केली जाईल आणि त्याच दिवशी फोन विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. हा नवीन Motorola 5G फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म Flipkart वर तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि मोबाईल दुकांनांतून खरेदी करता येईल.
Motorola Edge 60 Pro किंमत (Price) किती असू शकते?
या महिन्यात लॉन्च झालेल्या Motorola Edge 60 Fusion आणि Edge 60 Stylus यांच्या किंमती पाहता, अंदाज आहे की Edge 60 Pro ची किंमत सुमारे ₹30,000 पर्यंत जाऊ शकते. याचा बेस व्हेरिएंट ₹28,999 किंवा ₹29,999 मध्ये सादर केला जाऊ शकतो. टॉप व्हेरिएंटची किंमत ₹32,000 पर्यंत असू शकते. तरीही अचूक किमतीसाठी 30 एप्रिलची प्रतीक्षा करावी लागेल.
Motorola Edge 60 Pro स्पेसिफिकेशन्स (Global Variant)
स्क्रीन (Display): Motorola Edge 60 Pro मध्ये 6.7-इंच आकाराची 1.5K Quad-Curved POLED डिस्प्ले दिली आहे. ही स्क्रीन 120Hz Refresh Rate, 4500nits Brightness आणि In-display Fingerprint Sensor टेक्नोलॉजीसह येते. यावर Gorilla Glass 7i चे संरक्षण दिले आहे.
परफॉर्मन्स (Performance): या स्मार्टफोनमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme Octa-Core Processor दिला गेला आहे जो 3.35GHz क्लॉक स्पीडपर्यंत कार्यक्षम आहे. अपेक्षा आहे की भारतातही हाच चिपसेट मिळेल.
कॅमेरा (Camera): फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Triple Rear Camera Setup आहे. यात 50MP LYT700C OIS, 50MP Ultra Wide, आणि 10MP Telephoto Sensor दिले गेले आहेत. तर सेल्फीसाठी 50MP Selfie Camera फ्रंटला मिळतो.
बॅटरी (Battery): फोनमध्ये 6,000mAh Battery दिली आहे, जी 90W Fast Charging सपोर्ट करते.
Motorola Edge 60 Fusion
Motorola Edge 60 Fusion चा 8GB RAM व्हेरिएंट ₹22,999 मध्ये आणि 12GB RAM व्हेरिएंट ₹24,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन Dimensity 7400 प्रोसेसरवर चालतो. यामध्ये 5,500mAh Battery आणि 68W Fast Charging मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP Triple Rear Camera आणि 32MP Selfie Camera आहे. फोनमध्ये 6.7-इंच Super HD+ 1.5K Curved AMOLED डिस्प्ले दिला आहे.
Motorola Edge 60 Stylus
Motorola Edge 60 Stylus ची किंमत ₹22,999 आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB Storage आहे आणि हा फोन Snapdragon 7s Gen 2 Processor वर काम करतो. यात 5,000mAh Battery आणि 68W Fast Charging मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP Triple Rear Camera आणि 32MP Selfie Camera आहे. या फोनमध्ये 6.7-इंच Super HD+ 2.5D Curved POLED Display आहे. यासोबत येणारा Smart Pen हाच या फोनची खासियत आहे.