Poco F7: 7550mAh बॅटरीसह Poco चा सर्वात दमदार स्मार्टफोन मेच्या अखेरीस भारतात होऊ शकतो लाँच

Poco F7 हा Redmi Turbo 4 Pro स्मार्टफोनचा रीब्रँडेड व्हर्जन असून 7550mAh बॅटरी, Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि Android 15 यांसह मेच्या अखेरीस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

On:
Follow Us

Xiaomi या चीनच्या टेक कंपनीकडून लवकरच Poco F7 हा नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Turbo 4 Pro चा रीब्रँडेड व्हर्जन (Rebranded Version) असल्याचे मानले जात आहे.

प्रसिद्ध टेक लीक करणारे Yogesh Brar यांच्या माहितीनुसार, Poco F7 भारतात मे महिन्याच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. अद्याप कंपनीकडून याच्या भारतातील लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, भारतातच हा फोन सर्वात आधी दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याचबरोबर Poco F7 Ultra देखील या फोनसहच लाँच होऊ शकतो.

हा स्मार्टफोन Redmi Turbo 4 Pro चा रीब्रँडेड व्हर्जन (Rebranded Version) असल्याचे मानले जात असल्यामुळे, त्याचे स्पेसिफिकेशन्सही जवळपास सारखेच असण्याची शक्यता आहे. Redmi Turbo 4 Pro चीनमध्ये आज लाँच होतोय, पण त्याचे सर्व फिचर्स आधीच लीक झाले आहेत. त्यानुसार, Poco F7 मध्ये पुढील स्पेसिफिकेशन्स असू शकतात:

Poco F7 चे संभाव्य फिचर्स

Poco च्या या दमदार स्मार्टफोनमध्ये 6.83-इंचाचा फ्लॅट OLED LTPS डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा 1.5K रिझोल्यूशन (2800 x 1280 pixels) असेल. या फोनच्या फ्रंटला 20MP सेल्फी कॅमेरा, तर रियरला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेकंडरी सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 (SM8735) प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो हाय-परफॉर्मन्स आणि पॉवर एफिशिएंसीसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज दिले जाऊ शकते.

Poco F7 मध्ये 7550mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 90W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल. फोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टम आणि Xiaomi च्या नव्या HyperOS 2.0 वर आधारित असू शकतो.

याशिवाय, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, मेटल मिड-फ्रेम, IR ब्लास्टर, आणि IP68/IP69 वॉटर व डस्ट रेसिस्टेंस यांसारखे प्रीमियम फिचर्सही यामध्ये पाहायला मिळू शकतात. Xiaomi ची ही नवी ऑफर मिड-सेगमेंट मार्केटमध्ये एक स्पर्धात्मक पर्याय ठरू शकते.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel