Vivo ने आपल्या प्रीमियम X सिरीजमध्ये एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. या दमदार फोनचं नाव Vivo X200 Ultra आहे. सध्या हा फोन फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून लवकरच तो ग्लोबल मार्केटमध्येही उपलब्ध होणार आहे.
या फोनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यामध्ये देण्यात आलेला जबरदस्त 200 मेगापिक्सेलचा (200MP) टेलीफोटो कॅमेरा, जो खास कॅमेरा लव्हर्स (Camera Lovers) साठी आकर्षण ठरणार आहे. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल जो कॅमेरा, परफॉर्मन्स (Performance), डिस्प्ले (Display) आणि बॅटरी (Battery) यामध्ये उत्तम अनुभव देईल, तर Vivo X200 Ultra तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.
चला तर मग जाणून घेऊया या नव्या हँडसेटचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Vivo X200 Ultra ची किंमत
Vivo X200 Ultra चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला बेस वेरिएंट CNY 6,499 (सुमारे ₹76,000) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याशिवाय याचे आणखी दोन वेरिएंट्सही उपलब्ध आहेत – 16GB + 512GB आणि 16GB + 1TB, ज्यांची किंमत अनुक्रमे CNY 6999 (सुमारे ₹81,800) आणि CNY 7999 (सुमारे ₹93,500) इतकी आहे.
Vivo X200 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo X200 Ultra हा एक प्रीमियम फ्लॅगशिप (Premium Flagship) स्मार्टफोन आहे. यात 6.8-इंचाचा QHD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यावर Corning Gorilla Victus Armour Glass ची सुरक्षाही आहे. परफॉर्मन्ससाठी या डिव्हाईसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 (Elite) चिपसेटसह 12GB LPDDR5x RAM आणि 256GB/512GB UFS 4.0 स्टोरेज देण्यात आले आहे, जे मल्टीटास्किंग आणि हाय-एंड गेमिंगसाठी एकदम योग्य आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Zeiss Optics सह 50MP Sony LYT-818 मुख्य कॅमेरा (Gimbal OIS), 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 200MP टेलीफोटो पेरिस्कोप लेंस (8.7x ऑप्टिकल झूम, 70x डिजिटल झूम) असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याच्या सहाय्याने 4K@60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्लो मोशन व्हिडिओ शूटिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत.
सेल्फीसाठी या हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सेल ऑटोफोकस कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त Vivo ने Zeiss सोबत मिळून तयार केलेला एक अॅड-ऑन Zoom Lens (f/2.3, 200mm) सुद्धा दिला आहे, जो ऑप्टिकल झूम रेंज 8.7x पर्यंत वाढवतो.
या हँडसेटमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. फोनला IP68/IP69 रेटिंग मिळाली असून यामुळे हा डिव्हाइस डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ (Waterproof) बनतो. शिवाय, यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यासारखे सिक्युरिटी फीचर्सही उपलब्ध आहेत.