Honor Power 5G हा ऑनर कंपनीचा नवा स्मार्टफोन 8000mAh बॅटरी (Battery) सह लॉन्च करण्यात आला आहे. मोठ्या बॅटरीशिवाय या फोनमध्ये दमदार कॅमेरा (Camera) आणि डिस्प्ले (Display) देखील आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये काय खास आहे.
Honor Power 5G झाला सादर
पॉवर बँकेसारखी बॅटरी असलेला Honor Power 5G स्मार्टफोन कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला आहे. यामध्ये तब्बल 8000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या व्हेरिएंट्सची किंमत किती?
या स्मार्टफोनच्या किंमती वेगवेगळ्या व्हेरिएंट्ससाठी ठरवण्यात आल्या आहेत.
- 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत आहे 1999 युआन (सुमारे ₹23,300)
- 12GB+256GB साठी किंमत आहे 2199 युआन (सुमारे ₹25,600)
- आणि 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत आहे 2499 युआन (सुमारे ₹29,000)
डिस्प्ले सुद्धा तगडा
या फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate) आणि 4000 nits ची पीक ब्राइटनेस (Peak Brightness) मिळते.
कॅमेरा देखील पॉवरफुल
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS तंत्रज्ञानासह 50MP मेन कॅमेरा दिला आहे. यासोबत 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सुद्धा आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
मजबूत आणि वॉटरप्रूफ आहे फोन
या स्मार्टफोनमध्ये दहा-स्तरीय अँटी-फॉल शॉक-एब्झॉर्प्शन स्ट्रक्चर 2.0 (Anti-Fall Shock-Absorption Structure 2.0) आणि 360-डिग्री वॉटरप्रूफ बॉडी (Waterproof Body) देण्यात आली आहे. हा फोन पाण्यात बुडवता, भिजवता आणि अगदी धुवता देखील येतो.
8000mAh बॅटरीसह दीर्घकाळ टिकणारा फोन
हा फोन 8000mAh क्षमतेच्या बॅटरीसह (Battery) सादर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी सहा वर्षांपर्यंत टिकू शकते. यात 66W वायर्ड फास्ट चार्जिंग (Fast Charging) आणि रिव्हर्स चार्जिंग (Reverse Charging) सुद्धा सपोर्ट करतो.
स्लिम आणि हलकाफुलका डिझाईन
इतकी मोठी बॅटरी असूनही हा स्मार्टफोन केवळ 7.98mm जाडीचा (Slim) आहे आणि त्याचे वजन फक्त 209 ग्रॅम (Lightweight) इतकेच आहे.















