सेगमेंट मधील सर्वात स्लिम Samsung स्मार्टफोन उद्या होतोय लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy M56 5G उद्या 17 एप्रिलला भारतात लॉन्च होतोय. 7.2mm स्लिम डिझाइन, 50MP कॅमेरा, Exynos 1480 चिपसेट आणि HDR सेल्फी व्हिडिओसह हा स्मार्टफोन ₹20,000 ते ₹30,000 मध्ये उपलब्ध होईल.

On:
Follow Us

Samsung Galaxy M56: नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. भारतीय बाजारात 17 एप्रिल रोजी Samsung कंपनीचा एक भन्नाट फोन लॉन्च होणार आहे. आपण बोलतोय Samsung Galaxy M56 5G या फोनबद्दल. दावा केला जातो की, हा फोन आपल्या सेगमेंटमधील सर्वात पातळ (slimmest) असेल आणि याचे वजन फक्त 180 ग्रॅम असेल.

हा फोन 7.2mm स्लिम असेल आणि यात HDR सेल्फी व्हिडिओ (HDR selfie video) साठी सपोर्ट मिळणार आहे. या फोनमध्ये मजबूत बॉडी देखील मिळेल. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा (50MP rear camera) दिला जाणार आहे. चला, पाहूया या फोनमध्ये कोणते खास फिचर्स मिळतात…

किंमत आणि लॉन्चिंगबाबत माहिती

हा स्मार्टफोन 17 एप्रिल दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. तो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच Amazon वरून खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत ₹20,000 ते ₹30,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Galaxy M56 5G चे खास फिचर्स

Amazon लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy M56 5G मध्ये Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन दिलं जाईल. याबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ते जुन्या मॉडेलच्या तुलनेत 2 मीटर फॉल एंड्युरन्स आणि 4 पट अधिक स्क्रॅच रेसिस्टन्स (scratch resistance) देते.

यात Vision Booster सह sAMOLED+ स्क्रीन असेल, जी जुन्या हँडसेटच्या तुलनेत 36% अधिक पातळ बेजेल्स आणि 33% अधिक ब्राइट डिस्प्ले (bright display) प्रदान करेल.

पॉवरफुल कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy M56 5G मध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. कंपनीने सांगितलं आहे की, हा कॅमेरा बेहतर नाइट फोटोग्राफी (night photography) ला सपोर्ट करेल.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाणार असून, तो HDR सपोर्टसह येईल. शिवाय, AI इमेजिंग टूल्स जसे की Edit Suggestion, Object Eraser, आणि Image Clipper देखील उपलब्ध असतील.

सेगमेंटमधील सर्वात पातळ स्मार्टफोन

लिस्टिंगवरून समजते की, या फोनमध्ये Exynos 1480 चिपसेट (Exynos 1480 chipset) दिला जाईल, जो 8GB RAM सोबत मिळेल. तसेच, तो Android 15 वर आधारित One UI स्किनवर चालेल, अशी शक्यता आहे.

कंपनीचा दावा आहे की, हा फोन मागील मॉडेल म्हणजेच Galaxy M55 5G पेक्षा 30% अधिक स्लिम असेल. 7.2mm स्लिम प्रोफाइलसह, हा फोन आपल्या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन ठरेल. याचे एकूण वजन 180 ग्रॅम असेल.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel