OPPO ने परत केली कमाल! 50MP कॅमेरे, 6000mAh बॅटरीसह दोन ऑल राउंडर स्मार्टफोन लाँच

OPPO ने Find X8s आणि X8s+ हे दोन दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले असून त्यात 3 x 50MP कॅमेरे, Dimensity 9400+ प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि आकर्षक डिझाइन मिळतंय. भारतात लवकरच!

On:
Follow Us

OPPO ने पुन्हा एकदा आपल्या Find सीरीजमधून भन्नाट फ्लॅगशिप (Flagship) स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या मालिकेतील दोन नवीन फोन्स OPPO Find X8s आणि OPPO Find X8s+ असे आहेत. दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9400+ चा पॉवरफुल प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि प्रीमियम डिझाइन देण्यात आलं आहे. सध्या हे स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आले असून लवकरच भारतातही त्यांची एंट्री होण्याची शक्यता आहे.

OPPO Find X8s आणि X8s+ च्या किंमती

Find X8s हा Hoshino Black, Moonlight White, Island Blue आणि Cherry Blossom Pink रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर X8s+ मॉडेल Hoshino Black, Moonlight White आणि Hyacinth Purple या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

  • OPPO Find X8s आणि X8s+ चा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंट सुमारे ¥4199 (₹49,290) मध्ये येतो.
  • Find X8s चा 16GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंट सुमारे ¥4399 (₹51,640) मध्ये उपलब्ध आहे.
  • या दोन्ही फोन्सच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ¥4699 (₹55,160) आहे.

सध्या हे फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून 16 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

OPPO Find X8s आणि X8s+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO Find X8s हा एक कॉम्पॅक्ट फोन आहे ज्यामध्ये 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये जगातील सर्वात पातळ बेजेल आहे, ज्याचा आकार फक्त 1.25mm इतका आहे. हा फोन केवळ 7.73mm जाड असून, 5700mAh बॅटरी असूनही याचे वजन फक्त 179 ग्रॅम आहे.

OPPO Find X8s सीरीज हे पहिले स्मार्टफोन्स आहेत जे MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसरवर चालतात. यामध्ये OPPO LUMO Imaging System असून त्यात तीन 50MP कॅमेरे दिलेले आहेत – मुख्य कॅमेरा (Main Camera), अल्ट्रा-वाइड (Ultra-wide) आणि 3X पेरिस्कोप टेलीफोटो (Periscope Telephoto).

यामध्ये एक नवीन Shortcut बटन देण्यात आले आहे जे एका क्लिकवर AI One-Key Flash Memory सक्रिय करतं आणि वापरकर्त्याला कस्टम फंक्शन्ससाठी वापरता येतं. या फोन्सना IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली असून, हे पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित (Water and Dust Resistant) आहेत.

Find X8s+ मध्ये यापेक्षाही मोठा, 6.59-इंच स्क्रीन देण्यात आला आहे आणि यात एक जबरदस्त 6000mAh बॅटरी आहे. दोन्ही फोन्समध्ये 80W Wired Fast Charging आणि 50W Wireless Charging ची सुविधा आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel