Redmi चा Eye-Comfort डिस्प्ले असलेला दमदार स्मार्टफोन, 15 एप्रिलला होणार लॉन्च

₹7000 च्या आत लॉन्च होणारा Redmi A5 स्मार्टफोन 15 एप्रिलला येतोय. 5200mAh बॅटरी, Eye-Comfort डिस्प्ले आणि 32MP कॅमेरा अशा दमदार फीचर्ससह हा फोन खरेदीसाठी तयार व्हा!

On:
Follow Us

Xiaomi चा उप-ब्रँड असलेला Redmi लवकरच भारतीय बाजारात आपला नवा बजेट स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा स्मार्टफोन Redmi A5 असणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटद्वारे Redmi A5 ची भारतामधील लॉन्च डेट कन्फर्म केली आहे.

यासोबतच कंपनीच्या mi.in या वेबसाइटवर या स्मार्टफोनचा प्रॉडक्ट पेज देखील लाईव्ह करण्यात आला आहे. Redmi चा हा परवडणारा स्मार्टफोन 15 एप्रिल रोजी अधिकृतपणे सादर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या किफायतशीर Redmi फोनचे फीचर्स, कलर व्हेरिएंट्स आणि संभाव्य किंमत:

Redmi A5 चे कलर व्हेरिएंट्स

Redmi A5 भारतात 15 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. लॉन्चपूर्वीच कंपनीच्या मायक्रोसाईटवरून माहिती समोर आली आहे की हा Redmi स्मार्टफोन Jaisalmer Gold, Pondicherry Blue आणि Just Black या तीन आकर्षक रंगांत उपलब्ध असेल.

Redmi A5 चे फीचर्स

Redmi च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 120Hz चा हाय रिफ्रेश रेट देण्यात आला आहे, जो आपल्या सेगमेंटमधील सर्वात स्मूथ आय-कम्फर्ट डिस्प्ले (Eye-Comfort Display) ठरणार आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 32MP मुख्य कॅमेरा आणि LED फ्लॅश दिला आहे. सेल्फीव्हिडिओ कॉलिंग साठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

Redmi A5 मध्ये Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB LPDDR4X RAM सह 128GB स्टोरेज पर्यंत उपलब्ध असेल. या फोनची रॅम 4GB + 4GB, म्हणजे एकूण 8GB पर्यंत एक्सटेंड करता येणार आहे.

हा परवडणारा Redmi फोन 5,200mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह सादर होतोय. फोनच्या बॅक साईडला USB Type C चार्जिंग पोर्ट असून तो 15W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो. शिवाय, यामध्ये साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे.

Redmi A5 ची संभाव्य किंमत

Redmi A5 आधीच ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर या फोनची किंमत 79 डॉलर, म्हणजेच सुमारे ₹6,700 ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज या सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की भारतातही या फोनची किंमत ₹7000 च्या आतच असणार आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel