Oppo Find X8 Ultra Launched: जर तुम्ही मोठ्या बॅटरीसह (6100mAh battery), दमदार रॅम (16GB RAM) आणि पूर्ण वॉटरप्रूफ (Full Waterproof) स्मार्टफोन शोधत असाल, तर Oppo ने नुकताच सादर केलेला Find X8 Ultra फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. सध्या हा नवीन X-Series फोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे.
Oppo Find X8 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असून त्याला 16GB पर्यंत RAM मिळते. फोनमध्ये 6.82-इंचाचं 2K रिझोल्यूशन असलेलं AMOLED डिस्प्ले दिलं आहे. याच्या मागील बाजूस पाच कॅमेरे देण्यात आले असून त्यातील चार 50MP चे लेंस आहेत आणि एक 2MP स्पेक्ट्रल सेन्सर आहे.
यामध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 6100mAh क्षमतेची बॅटरी आहे. Find X8 आणि Find X8 Pro प्रमाणेच, हा फोन देखील IP68 + IP69 रेटिंगसह येतो, म्हणजेच हा पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे.
Oppo Find X8 Ultra ची किंमत किती आहे?
या फोनचे तीन वेगवेगळ्या RAM आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये व्हेरिएंट्स लाँच करण्यात आले आहेत. 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत CNY 6,499 (सुमारे ₹76,000), 16GB+512GB व्हेरिएंटची किंमत CNY 6,999 (सुमारे ₹82,000), आणि 16GB+1TB सैटेलाइट कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या टॉप व्हेरिएंटची किंमत CNY 7,999 (सुमारे ₹94,000) आहे. हा फोन तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे – Hoshino Black, Moonlight White, आणि Morning Light.
Oppo Find X8 Ultra चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स
हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि Android 15 वर आधारित ColorOS 15 स्किनसह काम करतो. यामध्ये 6.82 इंचाचा 2K (3168×1440 pixels) AMOLED LTPO डिस्प्ले आहे, जो Dolby Vision, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स ब्राइटनेससह येतो. यात Snapdragon 8 Elite चिपसेट दिला असून त्याला 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज मिळते.
उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी 6 कॅमेरे
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Hasselblad-ट्यून रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP चा Sony LYT-900 1-इंच टाइप सेन्सर, 50MP चा Samsung JN5 अल्ट्रावाइड कॅमेरा, 50MP चा Sony LYT-700 3x टेलीफोटो कॅमेरा, 50MP चा Sony LYT-600 6x पेरिस्कोप कॅमेरा आणि एक 2MP चा स्पेक्ट्रल सेन्सर आहे. हा सेटअप Oppo LUMO Image Engine सह येतो. सेल्फीसाठी 32MP चा Sony LYT506 फ्रंट कॅमेरा आहे.
IP68 + IP69 रेटिंगसह ड्युअल प्रोटेक्शन
फोनमध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth, NFC आणि IR Remote Control सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी फोनला IP68 आणि IP69 ड्युअल रेटिंग मिळालेली आहे. याला SGS Five-Star Drop Resistance सर्टिफिकेशनही मिळाले आहे. फोनमध्ये Ultrasonic Fingerprint Sensor आणि 0916T Haptic Motor देखील दिली आहे.
मोठी बॅटरी आणि सुपर फास्ट चार्जिंग
Oppo Find X8 Ultra मध्ये 6100mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 10W Reverse Wireless Charging सपोर्ट देखील मिळतो. फोनचं वजन 226 ग्रॅम असून मापदंड 163.09×76.80×8.78mm इतकं आहे.
यामध्ये एक Shortcut Button दिला असून त्याचा वापर स्क्रीनशॉट घेण्यासाठी आणि इतर फंक्शन्ससाठी केला जाऊ शकतो. Find X8 Pro प्रमाणे, या फोनमध्ये डबल टॅप केल्याने कॅमेरा उघडण्यासाठी Quick Button ही सुविधा आहे.