6000mAh बॅटरी, IP69 रेटिंगसह बजेट स्मार्टफोन Realme Narzo 80x भारतात लॉन्च, किंमत जाणून घ्या

6000mAh बॅटरी, IP69 रेटिंग आणि MediaTek Dimensity 6400 प्रोसेसरसह Realme Narzo 80x 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि सेल डिटेल्स.

On:
Follow Us

Realme ने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Realme Narzo 80x सादर केला आहे. हा स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, दमदार 6000mAh बॅटरी, जबरदस्त परफॉर्मन्स देणारा MediaTek Dimensity 6400 चिपसेट, तसेच पाणी आणि धुळीपासून संरक्षण करणारी IP69 रेटिंग यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

कंपनीने हे डिव्हाइस विशेषतः तरुण वर्ग आणि पॉवर यूजर्स लक्षात घेऊन तयार केले आहे. चला, या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Realme Narzo 80x 5G ची किंमत आणि उपलब्धता

Realme Narzo 80x 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. पहिल्या व्हेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत ₹13,999 इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, ₹500 चा बँक ऑफर आणि ₹1,500 चा कूपन सूट मिळाल्यानंतर हा फोन फक्त ₹11,999 मध्ये खरेदी करता येतो. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले असून त्याची किंमत ₹14,999 आहे. ऑफर्सनंतर हा फक्त ₹12,999 मध्ये उपलब्ध होतो.

Realme Narzo 80x 5G ची Limited Period Sale 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत होणार आहे. ग्राहक realme.com आणि Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Realme Narzo 80x 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.72 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट करतो. याची स्क्रीन 950 nits च्या पीक ब्राइटनेससह येते, त्यामुळे तेज उन्हातसुद्धा उत्तम व्ह्यूइंग अनुभव मिळतो.

प्रोसेसर: या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी MediaTek Dimensity 6400 चिपसेट वापरण्यात आले आहे. हे चिपसेट 6nm प्रोसेसवर आधारित असून उत्कृष्ट परफॉर्मन्ससह कमी ऊर्जा वापर करते.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी रिअर साइडला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो बेसिक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी योग्य आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: Realme Narzo 80x 5G मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे हा डिव्हाइस झपाट्याने चार्ज होतो आणि दीर्घकाळ टिकतो.

सॉफ्टवेअर: हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित realme UI 6.0 वर काम करतो, जो वापरकर्त्याला स्मूथ आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर अनुभव देतो.

इतर फीचर्स: हा फोन IP69 रेटिंगसह येतो म्हणजे तो पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित आहे. याशिवाय, मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि 200% Super Volume Mode यांसारखी दमदार फीचर्सही यात दिली आहेत.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel