जर तुम्ही ₹20,000 च्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realme 13 Pro हा एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. Amazon या ई-कॉमर्स साइटवर या फोनवर मोठी सवलत मिळत असून, त्यासोबत आकर्षक बँक ऑफर आणि एक्सचेंज डील्स देखील आहेत. या सर्व ऑफर्समुळे तुम्ही चांगली बचत करू शकता. चला तर मग, या डील्सची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Realme 13 Pro किंमत आणि ऑफर (Price & Offers)
Realme 13 Pro चा 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर ₹19,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन गेल्या वर्षी जुलै महिन्यात ₹26,999 मध्ये लॉन्च झाला होता. बँक ऑफरचा विचार केला तर HDFC Bank च्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹1250 चा इंस्टंट डिस्काउंट मिळतो, ज्यामुळे या फोनची प्रभावी किंमत ₹18,749 होते.
तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला ₹17,400 पर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. मात्र, ही सूट तुमचा जुना फोन कोणत्या स्थितीत आहे आणि तो कोणता मॉडेल आहे यावर अवलंबून आहे.
Realme 13 Pro स्पेसिफिकेशन्स (Specifications)
Realme 13 Pro मध्ये 6.7 इंचाची Full HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल, 120Hz Refresh Rate आणि 240Hz Touch Sampling Rate आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला आहे. हे डिव्हाइस Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर चालते.
कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, Wi-Fi, USB Type-C पोर्ट आणि Bluetooth 5.2 यांसारखे पर्याय दिले आहेत. 5200mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 45W Fast Charging ला सपोर्ट करते.
कॅमेरा सेगमेंटबद्दल बोलायचं झाल्यास, 13 Pro मध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनचे डायमेन्शन्स पाहिल्यास, लांबी 161.34 मिमी, रुंदी 75.91 मिमी, जाडी 8.41 मिमी आणि वजन 183 ग्रॅम आहे. हे डिव्हाइस Monet Gold, Monet Purple आणि Emerald Green या रंगांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय, IP65 रेटिंग मुळे डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन देखील मिळते.