Samsung ने आपले दोन नवीन टॅबलेट्स Galaxy Tab S10 FE आणि Galaxy Tab S10 FE+ जागतिक स्तरावर लाँच केले आहेत. हे टॅबलेट्स आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून, त्यांच्या किंमतींचाही खुलासा झाला आहे.
मोठा डिस्प्ले, स्लीम बेझल आणि अत्याधुनिक AI फीचर्स यामुळे हे टॅबलेट्स अधिक आकर्षक बनले आहेत. युजर्ससाठी याचा वापर अधिक सुलभ होणार आहे. आता भारतात याच्या किंमती आणि प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Samsung Galaxy Tab S10 FE आणि S10 FE+ ची भारतातील किंमत
Samsung Galaxy Tab S10 FE चा 8GB + 128GB Wi-Fi व्हेरिएंट ₹42,999 मध्ये उपलब्ध आहे, तर 12GB + 256GB Wi-Fi मॉडेलची किंमत ₹53,999 ठेवण्यात आली आहे. याच्या 8GB + 128GB 5G व्हेरिएंटसाठी ₹50,999 मोजावे लागतील, तर 12GB + 256GB Wi-Fi मॉडेल ₹61,999 मध्ये मिळेल.
Samsung Galaxy Tab S10 FE+ च्या 8GB + 128GB Wi-Fi व्हेरिएंटची किंमत ₹55,999 आहे, तर 12GB + 256GB Wi-Fi मॉडेल ₹65,999 मध्ये मिळेल. याच्या 8GB + 128GB 5G व्हेरिएंटसाठी ₹63,999 तर 12GB + 256GB Wi-Fi मॉडेल ₹73,999 मध्ये उपलब्ध आहे.
Galaxy Tab S10 FE आणि S10 FE+ कुठे खरेदी करता येईल?
हे दोन्ही टॅबलेट आजपासून Samsung.com, Amazon.in आणि इतर ऑनलाइन रिटेलर्ससोबतच ऑफलाइन स्टोअर्समध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. यांची विक्री 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही प्री-बुकिंग करता, तर तुम्हाला ₹5,000 पर्यंतच्या बँक ऑफर्स आणि ₹8,000 पर्यंतच्या अतिरिक्त बेनिफिट्स मिळू शकतात.
Samsung Galaxy Tab S10 FE आणि S10 FE+ वर मिळणाऱ्या प्री-बुकिंग ऑफर्स
HDFC Bank आणि ICICI Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट किंवा EMI च्या माध्यमातून खरेदी केल्यास Galaxy Tab S10 FE वर ₹4,000 ची इन्स्टंट सूट आणि Galaxy Tab S10 FE+ वर ₹5,000 ची इन्स्टंट सूट मिळेल.
Galaxy Buds 3, ज्यांची मूळ किंमत ₹14,999 आहे, ते प्री-बुकिंगवर फक्त ₹6,999 मध्ये मिळतील. याशिवाय Tab S10 FE चे कीबोर्ड कव्हर ₹7,999 मध्ये आणि Tab S10 FE+ चे कीबोर्ड कव्हर ₹10,999 मध्ये उपलब्ध असेल, ज्यांची मूळ किंमत अनुक्रमे ₹15,999 आणि ₹18,999 आहे. ही ऑफर 6 एप्रिलपर्यंत वैध असेल.
Samsung Galaxy Tab S10 FE आणि S10 FE+ चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Galaxy Tab S10 FE मध्ये 10.9-इंच WUXGA+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. तर Galaxy Tab S10 FE+ मध्ये 13.1-इंच WQXGA+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट देखील 90Hz आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये Exynos 1580 प्रोसेसर दिला आहे, जो दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो.
Galaxy Tab S10 FE मध्ये 8,000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तर Galaxy Tab S10 FE+ मध्ये 10,090mAh ची मोठी बॅटरी असून, तीही 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
कॅमेरा आणि अन्य फीचर्स
टॅबलेटच्या मागील बाजूस 13MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकस आणि LED फ्लॅश सपोर्ट करतो. समोरील बाजूस 12MP फ्रंट कॅमेरा असून, त्याला 120° Field of View (FoV) दिला आहे.
आवाजाच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी यामध्ये Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसेच, हे टॅबलेट IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्स रेटिंगसह येतात, म्हणजेच पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहेत. यात S Pen सपोर्ट आणि Google Circle-To-Search AI फीचर देखील आहे, ज्यामुळे युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळेल.