Samsung च्या सर्वात पातळ स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge च्या लॉन्चपूर्वी एक नवीन हँड्स-ऑन व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. Galaxy S25 Edge हा 16 एप्रिलला लाँच होण्याची अपेक्षा आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. लीक झालेल्या हँड्स-ऑन व्हिडिओमध्ये या डिव्हाइसची डमी युनिट स्पष्टपणे पाहायला मिळते. चला तर मग Galaxy S25 Edge बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy S25 Edge: लीक झालेला व्हिडिओ
कोरियन YouTuber The Sinza यांनी हा व्हिडिओ पाहिला असून यामध्ये फोनच्या डिझाइनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Galaxy S25 Edge फक्त 5.84mm जाड असून, हा Galaxy S25 Ultra पेक्षा बऱ्याच प्रमाणात पातळ आहे. फोनच्या खालच्या बाजूला USB Type-C पोर्ट, माइक्रो सिम स्लॉट आणि स्पीकर ग्रिल दिले आहेत.
व्हिडिओमध्ये टायटॅनियम जेट ब्लॅक (Titanium Jet Black) रंगाची झलक पाहायला मिळते. या शेडबद्दल यापूर्वी माहिती समोर आली होती, पण प्रत्यक्ष पाहायला मिळालेली नव्हती. गडद टोन असलेल्या या फिनिशिंगमुळे हा रंग चाहत्यांचा लवकरच आवडता ठरू शकतो.
Galaxy S25 Edge हा टायटॅनियम जेट ब्लॅक (Titanium Jet Black), टायटॅनियम आईसी ब्लू (Titanium Ice Blue) आणि टायटॅनियम सिल्वर (Titanium Silver) या रंगांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हा फोन टायटॅनियम (Titanium) बॉडी असलेला असून, तो मजबूत, हलका आणि स्क्रॅच-रेसिस्टंट असणार आहे. यामुळे डिव्हाइसला एक प्रीमियम लुक मिळतो.
Galaxy S25 Edge किती पातळ असेल?
Galaxy S25 Edge ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची पातळ प्रोफाइल. हा फोन केवळ 5.84mm जाड आणि 162 ग्रॅम वजनाचा असेल. उपलब्ध लीकनुसार, iPhone 17 Air पेक्षा तो किंचित अधिक जाड असणार आहे, मात्र Samsung चा आतापर्यंतचा सर्वात पातळ फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून याची ओळख निर्माण होणार आहे.
Samsung Galaxy S25 Edge चे फीचर्स (लीक माहिती)
Galaxy S25 Edge मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स असणार आहेत. हा फोन दमदार हार्डवेअर आणि आकर्षक डिझाइनसह येईल. डिव्हाइस Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेटसह सुसज्ज असेल, ज्यामुळे मल्टीटास्किंग, गेमिंग परफॉर्मन्स आणि फ्लॅगशिप-लेव्हल स्पीड अनुभवता येईल.
बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, Galaxy S25 Edge मध्ये 3,900mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, अशी चर्चा आहे. ब्लूटूथ 5.4 (Bluetooth 5.4) सपोर्टसह तो अधिक वेगवान आणि स्थिर वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
फोनचा कॅमेरा सेटअप देखील जबरदस्त असणार आहे. यामध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा देण्यात येईल, जो अतिशय डिटेल फोटो कॅप्चर करू शकतो. सोबतच, 50MP अल्ट्रा-वाइड लेंस असण्याची शक्यता आहे. 12MP फ्रंट कॅमेरा हाय-क्वालिटी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दिला जाणार आहे.
Samsung Galaxy S25 Edge ची किंमत (लीक माहिती)
Android Headlines च्या रिपोर्टनुसार, Galaxy S25 Edge मध्ये 12GB RAM असेल आणि तो 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंट्स मध्ये उपलब्ध असेल.
- 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत: EUR 1,200 (₹1,13,660) ते EUR 1,300 (₹1,23,132) दरम्यान असण्याची शक्यता आहे.
- 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत: EUR 1,300 (₹1,23,132) ते EUR 1,400 (₹1,32,603) दरम्यान असू शकते.















