Oppo Find X8 सीरिजमध्ये कंपनी पुढील महिन्यात तीन नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या सीरिजमध्ये Find X8s आणि Find X8 Ultra या स्मार्टफोन्सची आधीच चर्चा सुरू होती. मात्र, आता नव्या लीकमधून आणखी एका मॉडेलची माहिती समोर आली आहे.
हा फोन Find X8S+ असू शकतो. तसेच, Find X8s आणि अन्य मॉडेल्सचे मुख्य स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चला तर मग, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Oppo Find X8s, Find X8S+ चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Find X8s आणि Find X8S+ यांच्या लॉन्चपूर्वीच दोन्ही स्मार्टफोन्सचे मुख्य स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. चीनमधील प्रसिद्ध टिप्स्टर Digital Chat Station यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. Find X8s मध्ये 6.3-इंचाचा 1.5K डिस्प्ले मिळेल, तर X8S+ मध्ये 6.59-इंचाचा फ्लॅट डिस्प्ले पॅनल असू शकतो. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.
Oppo Find X8s आणि Find X8S+ हे दोन्ही स्मार्टफोन्स IP68 आणि IP69 सर्टिफिकेशनसह येऊ शकतात, म्हणजेच हे स्मार्टफोन्स पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित असतील. यामध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला जाऊ शकतो. Find X8S+ मध्ये 5,860mAh बॅटरी असेल, तर Find X8S मॉडेलसाठी बॅटरीसंबंधी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र, एका जुन्या लीकनुसार, Find X8S मध्ये 5,700mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन 179 ग्रॅम वजनाचा आणि फक्त 7mm जाडीचा असणार आहे. तसेच, या स्मार्टफोन्समध्ये 1.38mm च्या अतिशय पातळ बेजल्स असतील.
प्रोसेसरबद्दल सांगायचे झाल्यास, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Dimensity 9400+ (डायमेंसिटी 9400+) चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर 11 एप्रिल रोजी अधिकृतपणे सादर केला जाईल.
Oppo Find X8 Ultra – एक हाय-एंड वेरिएंट
या सीरिजमधील Find X8 Ultra हा सर्वात हाय-एंड वेरिएंट असणार आहे. यात 2K फ्लॅट डिस्प्ले दिला जाणार असून, हा फोन अल्ट्रा-नॅरो बेजल्स डिझाइनसह येईल. तसेच, यामध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाण्याची शक्यता आहे.
Oppo ने Find X8 Ultra मध्ये दोन पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरे दिले आहेत, ज्यापैकी एका कॅमेरामध्ये 3x zoom, तर दुसऱ्यामध्ये 6x zoom फीचर असू शकतो. याशिवाय, 6,000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असणार आहे.