OnePlus ने केला विक्रमी सेल, 70 दिवसांत विकले 10 लाखांहून अधिक स्मार्टफोन, तुमची घेतला का

OnePlus Ace 5 Series ने लॉन्चच्या 70 दिवसांत 10 लाख स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. या दमदार फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 100W चार्जिंग आणि स्टॉर्म गेम कोअर टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

On:
Follow Us

OnePlus ने आपल्या नवीन स्मार्टफोन सिरीजने मार्केटमध्ये जबरदस्त धमाका केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, OnePlus Ace 5 Series च्या स्मार्टफोनने लॉन्च झाल्याच्या अवघ्या 70 दिवसांत 1 मिलियन (10 लाख) युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

कंपनीने ही सिरीज डिसेंबर 2024 मध्ये चीनमध्ये लॉन्च केली होती. या सिरीजमधील स्मार्टफोन्स अत्याधुनिक फीचर्सनी परिपूर्ण आहेत, ज्यात 100W फास्ट चार्जिंग आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला तर पाहूया या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OnePlus Ace 5 Series – फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 5 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6415mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. त्याचबरोबर, या सिरीजचा Pro व्हेरिएंट अधिक दमदार असून त्यामध्ये 6100mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग, आणि Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सचे इतर स्पेसिफिकेशन्स समान आहेत.

डिस्प्लेच्या बाबतीत, 6.78-इंचाचा Micro Quad Curved BOE X2 पॅनल देण्यात आला आहे, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी, या दोन्ही फोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स, आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, यात 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

गेमिंगसाठी, OnePlus ने यामध्ये ‘Storm Game Core’ टेक्नोलॉजी दिली आहे, जी हाय-परफॉर्मन्स गेमिंगचा अनुभव देते. फोन गरम होऊ नये यासाठी अ‍ॅडव्हान्स्ड कूलिंग सिस्टिम देखील समाविष्ट करण्यात आली आहे. याशिवाय, स्टेबल गेमिंगसाठी डेडिकेटेड eSports WiFi चिप आणि बायपास चार्जिंग सपोर्ट देखील यात देण्यात आला आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel