Infinix भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 50x 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने नुकतीच या स्मार्टफोनच्या लॉन्च डेटची अधिकृत घोषणा केली आहे. 27 मार्च 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत Infinix Note 50x 5G लाँच केला जाईल.
Flipkart वर या फोनची मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे, जिथे कंपनी हळूहळू याच्या खास वैशिष्ट्यांचा खुलासा करत आहे. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स सपोर्ट देखील मिळणार आहे. लॉन्चपूर्वीच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये असलेल्या प्रोसेसरबद्दल माहिती उघड केली आहे. चला तर जाणून घेऊया या फोनच्या फीचर्सबद्दल…
शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Infinix Note 50x 5G
Infinix Note 50x 5G या महिन्याच्या शेवटी लाँच होणार असून, नव्या अपडेटनुसार हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसरसह येणार आहे. हा मिड-रेंज प्रोसेसर Mali-G615 MC2 GPU सोबत मिळून कार्य करतो आणि यात 2.5GHz क्लॉक स्पीड असलेले चार Cortex-A78 हाय-परफॉर्मन्स कोअर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की, हा चिपसेट 90fps गेमिंग सक्षम करू शकतो.
कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे की, हा स्मार्टफोन Android 15 OS वर आधारित XOS 15 Custom Skin सह येईल. तसेच, यात AI-Powered Tools चा सपोर्ट दिला आहे. एका नवीन टीझरमध्ये Note 50x 5G च्या डिझाईन एलिमेंट्सचे सुद्धा प्रदर्शन करण्यात आले आहे. यात “Active Halo Lighting” सिस्टम समाविष्ट आहे, जी मूलतः LED रिंग आहे. ही रिंग Notifications, Charging Status आणि अन्य व्हिज्युअल फीडबॅकसाठी लाईट इफेक्ट देऊ शकते.
Infinix Note 50x 5G चा अनोखा डिझाईन आणि दमदार बॅटरी
भारताच्या बाजारपेठेत Infinix Note 50x 5G हा आपल्या “Gem Cut Camera Module” सह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. कंपनीने जाहीर केलेल्या टीझरमध्ये ऑक्टागोनल प्रिसिजन कट कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, जो या फोनच्या डिझाईनला प्रीमियम लुक देतो. TUV Certification च्या अहवालानुसार, या स्मार्टफोनमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल.
Infinix Note 40X 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये
नवीन Infinix Note 50x 5G हा Infinix Note 40X 5G चा उत्तराधिकारी म्हणून येत आहे आणि यात अनेक अपग्रेड्स पाहायला मिळतील. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Infinix Note 40X 5G भारतात ₹14,999 च्या प्रारंभिक किमतीत लाँच करण्यात आला होता.
या स्मार्टफोनचा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट होता. यात 6.78-इंचाचा Full HD+ (1080×2436 pixels) डिस्प्ले होता, जो 120Hz Dynamic Refresh Rate सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट सह लाँच करण्यात आला होता.
फोनमध्ये 108MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, 18W Wired Fast Charging आणि Wired Reverse Charging सपोर्ट दिला गेला होता.