जर तुम्ही पॉवरफुल लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. लोकप्रिय ब्रँड MSI ने आपला नवीन MSI RTX 50 सीरीज लॅपटॉप भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ड्रिवन संगणनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे लॅपटॉप AMD आणि Intel च्या नवीन प्रोसेसरसह सुसज्ज आहेत.
डीप लर्निंग सुपर सॅम्पलिंग (DLSS) 4 फ्रेम-जनरेशन तंत्रज्ञानासह नवीन NVIDIA GeForce RTX 50 सीरीज GPU देखील यात देण्यात आला आहे. सर्व मॉडेल्समध्ये 4K Mini LED स्क्रीन असून 96GB पर्यंत रॅम आणि 6TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.
या सीरिजमध्ये MSI Titan, Raider, Stealth आणि Vector मॉडेल्स समाविष्ट आहेत. या लॅपटॉपची किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती
MSI RTX 50 सीरीज अंतर्गत Vector 16 HX AI A2XWIG हा भारतात उपलब्ध असलेला बेस मॉडेल असून त्याची प्रारंभिक किंमत ₹2,99,990 आहे. याशिवाय, MSI Raider 18 HX AI A2XWIG आणि Raider 18 HX AI A2XWJG यांच्या किंमती अनुक्रमे ₹4,29,990 आणि ₹4,99,990 आहेत.
तसेच, MSI Titan 18 HX AI A2XWJG हा प्रीमियम लॅपटॉप असून त्याची किंमत ₹5,87,990 आहे, तर Titan 18 HX Dragon Edition Norse Myth A2XWJG हा स्पेशल एडिशन लॅपटॉप ₹6,29,990 मध्ये उपलब्ध आहे.
MSI च्या निवडक Titan, Raider आणि Vector मॉडेल्सवर ₹60,000 पर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, MSI एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर्सवर खरेदी केल्यास ₹3,000 चे स्पेशल कूपन आणि $30 (सुमारे ₹2,600) चा Steam Wallet कोड मिळतो. हे लॅपटॉप 31 मार्चपर्यंत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत.
MSI RTX 50 सीरीज लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स
MSI Titan 18 HX Dragon Edition Norse Myth हा भारतातील सर्वात उत्कृष्ट गेमिंग लॅपटॉपपैकी एक आहे. हा एक स्पेशल एडिशन मॉडेल आहे, जो 3D Dragon Keychain, Mouse, Mouse Pad आणि Color Box सह येतो.
हा लॅपटॉप Intel Core Ultra 9 Processor 285HX आणि NVIDIA GeForce RTX 5090 लॅपटॉप GPU सह येतो. याला 96GB DDR5 RAM आणि 6TB ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. यात 2TB NVMe PCIe Gen 5 SSD आणि दोन 2TB NVMe PCIe Gen 4 SSD चा कॉम्बिनेशन आहे. MSI Overboost Ultra टेक्नोलॉजी च्या मदतीने CPU आणि GPU कडून 270W पर्यंतची पॉवर मिळते.
यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 18-इंच 4K Mini LED स्क्रीन देण्यात आली आहे. थर्मल एफिशियंसी वाढवण्यासाठी Dedicated Cooling Pipes आणि Vapor Chamber Cooling सिस्टिम दिली आहे. तसेच, यात Thunderbolt 5 पोर्टचा समावेश आहे.
MSI Titan 18 HX AI A2XWJG चा स्टँडर्ड एडिशन देखील उपलब्ध असून त्यात समान स्पेसिफिकेशन्स आहेत, मात्र तो 64GB DDR5 RAM सह येतो.
MSI Raider आणि Vector सीरीजचे स्पेसिफिकेशन्स
MSI Raider सीरीजचे लॅपटॉप AMD Ryzen 9 9955HX3D प्रोसेसर किंवा Intel Core Ultra 9 Processor 285HX सह कॉन्फिगर करता येतात. NVIDIA GeForce RTX 5090 GPU सह हे 64GB DDR5 RAM आणि 4TB SSD स्टोरेज पर्यंतच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. गेमर्ससाठी RGB लाइटिंग आणि AMD 3D V-Cache Gen 2 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
AI आधारित ऍप्लिकेशन्ससाठी MSI Vector सीरीज भारतात आणली आहे, ज्यामध्ये Vector 16 HX AI A2XWIG हा प्रमुख मॉडेल आहे. यामध्ये Intel Core Ultra 9 Processor 275HX किंवा AMD Ryzen 9 9955HX, NVIDIA RTX 5080 GPU, 32GB DDR5 RAM आणि 2TB NVMe PCIe Gen 4 SSD दिले आहे. AI ऍप्लिकेशन्स आणि 3D डिझाइन सॉफ्टवेअरसाठी हा लॅपटॉप परिपूर्ण असल्याचा दावा कंपनीने केला आहे.