Four Important government cards: भारत सरकार सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारचे कार्ड जारी करते. या कार्डांचा वापर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. काही कार्डे सर्व भारतीयांसाठी अनिवार्य आहेत, जसे की आधार कार्ड. सरकार वेळोवेळी नवी योजना आणते आणि त्या योजनांसाठी नवी कार्डे जारी करते. या कार्डांच्या माध्यमातून सरकार नागरिकांना विविध सुविधा पुरवते, जसे की आरोग्य विमा, पेन्शन, सबसिडी इत्यादी.
सरकारच्या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट कार्डे असतात, ज्यासाठी काहीच लोक पात्र असतात. मात्र, काही कार्ड आणि सुविधा अशा आहेत, ज्याचा लाभ देशातील सर्व लोक घेऊ शकतात. चला, आज आपण अशा चार सरकारी कार्डांबद्दल माहिती घेऊया, जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.
1. आभा कार्ड (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट)
आभा कार्डाचे बरेच फायदे आहेत. हे कार्ड तुमचे सर्व आरोग्यविषयक रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवते. डॉक्टरांना तुमच्या जुन्या मेडिकल रिपोर्ट्सच्या आधारे योग्य उपचार देण्यास मदत होते. आभा म्हणजे एक 14 अंकी युनिक हेल्थ आयडी आहे, जो प्रत्येक व्यक्तीचे डिजिटल आरोग्य रेकॉर्ड म्हणून काम करतो. या कार्डाच्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व मेडिकल माहिती एका ठिकाणी सुरक्षित ठेवू शकता. तसेच, तुम्ही देशात कुठेही डॉक्टरांसोबत तुमचे रिपोर्ट्स शेअर करू शकता.
2. ई-संजीवनी कार्ड
ई-संजीवनी कार्ड एक डिजिटल आरोग्य सेवा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. कोरोना महामारीनंतर टेलिमेडिसिन सेवा खूप लोकप्रिय झाली आहे. या कार्डाच्या मदतीने तुम्ही डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून तुमच्या आजाराची माहिती घेऊ शकता.
3. पॅन कार्ड
पॅन कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. हे केवळ एक ओळखपत्र नाही तर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती पुरवते. पॅन कार्ड आयकर भरताना अत्यावश्यक असते. ते आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांची आणि कराच्या देणीबाबतची माहिती देते.
4. आधार कार्ड
आधार कार्ड हे भारत सरकारने दिलेले एक 12 अंकी युनिक ओळखपत्र आहे, ज्यामध्ये तुमची बायोमेट्रिक माहिती (बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या पुतळ्यांचे स्कॅन) समाविष्ट असते. आधार कार्ड हे तुमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. सरकारी योजनांमध्ये अर्ज करणे, बँक खाते उघडणे, मोबाइल कनेक्शन घेणे, किंवा इनकम टॅक्स रिटर्न भरणे यांसारख्या सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड अत्यावश्यक दस्तऐवज आहे.