PM Kisan: 18 वा हप्ता येण्या पूर्वी करून घ्या हे रजिस्ट्रेशन, अन्यथा संधी मिळणार नाही

PM Kisan योजनेचा 18वा हप्ता येणार आहे! तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल? मग ही तुमची शेवटची संधी असू शकते. त्वरित अर्ज करा!

On:
Follow Us

PM Kisan 18th Installment: पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा भाग व्हा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे फायदे:

या योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, कीटकनाशके, आणि शेतीचे उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत करते. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जाची गरज लागत नाही.

100 दिवसांच्या कार्यक्रमातील यश:

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, 100 दिवसांच्या कार्यक्रमात सॅचुरेशन ड्राईव्हद्वारे 25 लाखांपेक्षा जास्त नवीन शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची एकूण संख्या 9.51 कोटींवर पोहोचली आहे.

अर्ज कसा करावा:

www.pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या भाषेची निवड करा. तुम्ही शहरी भागातील शेतकरी असाल तर Urban आणि ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर Rural फार्मर रजिस्ट्रेशनचे पर्याय निवडा.

तुमचा आधार नंबर, फोन नंबर आणि राज्य निवडा. तुमच्या जमिनीचे तपशील भरा. जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करून सेव्ह करा. त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि गेट ओटीपीवर क्लिक करून सबमिट करा. या प्रक्रियेनंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जमा होईल.

eKYC कशी करावी:

पीएम किसान सन्मान निधी योजनेची 18वी हप्ता मिळवण्यासाठी eKYC करणे आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या CSC सेंटरला किंवा पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. पीएम किसान मोबाइल अॅपमधील फेस ऑथेंटिकेशन फिचरद्वारे तुम्ही घरबसल्या सहज eKYC करू शकता. हे अॅप तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. अधिक माहितीसाठी http://pmkisan.gov.in ला भेट द्या.

Manoj Sharma

My Name is Manoj Sharma, I Work as a Content Writer for marathigold.com and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel