5G smartphone on Amazon Sale: तुम्हाला कमी किमतीत 5G फोन खरेदी करण्यात रस असेल, तर Amazon चे 5G सुपरस्टोर तुमच्यासाठी आले आहे. जिथे तुम्हाला उत्तम सौदे मिळतात.
Amazon च्या या सुपरस्टोरमध्ये उत्कृष्ट फीचर्स असलेले 5G फोन 9 ते 10 हजार रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात या यादीमध्ये Samsung आणि Realme सारख्या ब्रँड कंपन्यांचे फोन समाविष्ट आहेत. जे तुम्ही उत्तम बँक सूट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅकसह खरेदी करू शकता.
Samsung Galaxy M14 5G
जर तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल तर तुम्हाला हा फोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह 9,999 रुपयांच्या सेलमध्ये मिळत आहे. जिथे कंपनी तुम्हाला जवळपास 500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. हा फोन 485 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो.
त्याच वेळी, तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 9,450 रुपयांची सूट मिळत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या डिवाइस मध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. आणि फोटोंसाठी 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Realme Narzo 60X 5G
येथे तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह Realme चा हा फोन 10,499 रुपयांना खरेदी करायला मिळत आहे. जिथे तुम्हाला ५०० रुपयांची सवलत दिली जात आहे. तसेच तुम्हाला कॅशबॅक ऑफरमध्ये 525 रुपयांचा फायदा मिळत आहे.
याशिवाय 9,900 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. तसेच, ते EMI पर्यायावर विकले जात आहे. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi 13C 5G
Redmi फोनची किंमत 10,499 रुपये देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्हाला 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. जे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येते.
या फोनवर तुम्हाला 525 रुपयांचा कॅशबॅक आणि 9,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या डिव्हाइसमध्ये 6.74 इंच HD+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी यात 50-मेगापिक्सलचा AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.















