7th Pay Commission: वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वाढीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्क्यांवरून 50 टक्के इतका झाला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ आगामी मार्च महिन्याच्या पगारासह मिळणार आहे. याशिवाय, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची डीए फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात मुंबई महापालिका आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ
महाराष्ट्रात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या डीए मध्ये देखील 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता त्यांना 50 टक्के डीए मिळणार आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. याचा रोख लाभ एप्रिलमध्ये मिळेल. त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची डीए फरकाची रक्कमही दिली जाईल.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीचा निर्णय अद्याप रखडला
मात्र, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये अद्याप वाढ झालेली नाही. निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे निवडणुकीनंतरच त्यांच्या डीए वाढण्याची शक्यता आहे.
इतर काही राज्यांनीही डीए वाढवला
हरियाणा आणि बिहार राज्यांनीही आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4 टक्क्यांची वाढ करून ती 50 टक्के केली आहे. याशिवाय, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकारनेही डीए वाढवण्याची घोषणा केली आहे.