Private Employes: संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे EPF खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPF) द्वारे उघडले जाते. परंतु अनेकवेळा असे दिसून येते की ईपीएफ खाते उघडताना नाव, जन्मतारीख इत्यादीमध्ये काही प्रकारची चूक केली जाते.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफचे पैसे काढण्यात अडचणी येतात. या लेखात आपण EPF खात्यात असलेली माहिती किती वेळा बदलू शकता हे जाणून घेणार आहोत.
तुम्ही एकावेळी पाच बदलांसाठी सिंगल आणि जॉइंट डिक्लेरेशनद्वारे अर्ज करू शकता. 11 मार्च रोजी जारी केलेल्या SOP च्या आधारावर, तुम्ही 5 पेक्षा जास्त बदल केल्यास, त्याची OIC द्वारे तपासणी केली जाईल. EPF मध्ये कोणतीही माहिती बदलण्यापूर्वी एकदा तपासा. अन्यथा पुन्हा माहिती बदलताना त्रासाला सामोरे जावे लागेल.
ईपीएफ प्रोफाइलमधील माहिती कशी बदलावी?
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूएएन आणि पासवर्डद्वारे ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला मॅनेज टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधारनुसार योग्य माहिती द्यावी लागेल.
यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि अपडेट डिटेल्स वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज नियोक्त्याला पाठवला जाईल. तुम्ही डिलीट रिव्हेस्ट द्वारे आपली विनंती रद्द करू शकता.