Uncategorized

व्यापारी शेतकऱ्या कडून रोज लोणी खरेदी करत असे, एक दिवस लोण्याचे वजन केले तर ते कमी निघाले.. पुढे काय झाले जाणून घ्या

जुनी म्हण आहे जशी करणी तशी भरणी किंवा जसे कराल तसे भराल, म्हणजेच आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला प्राप्त होते. येथे आपण जाणून घेऊया एक लोककथा ज्यामध्ये हेच सांगितलेले आहे कि आपल्या कर्माची फळे आपल्याला नक्की मिळतेच..

लोककथेच्या अनुसार एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो शेती करण्या सोबतच लोणी विकण्याचे काम करत होता. शेतकरी दररोज शहरातील बाजारामध्ये लोणी विकण्यासाठी जात होता. एका व्यापाऱ्याला त्याचे लोणी आवडायचे त्यामुळे त्याने रोज एक किलो लोणी देण्यास सांगितले. शेतकरी आनंदी झाला, कारण त्याचे एक किलो लोणी आता कोणतेही कष्ट न घेता विक्री होणार होते. शेतकऱ्याने त्याच व्यापाऱ्याच्या दुकानांमधून काही सामान आणि एक किलो गूळ खरेदी केले. सामान घेऊन शेतकरी घरी आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसा पासून शेतकरी व्यापाऱ्याला रोज एक किलो लोणी देऊ लागला. अनेक दिवस असेच सुरु होते.

एक दिवस दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्राम होते. दुकानदार क्रोधीत झाला. त्याने विचार केला कि हा शेतकरी मला धोका देत आहे, पैसे एक किलो लोण्याचे घेत आहे आणि देतोय फक्त 900 ग्राम. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी लोणी घेऊन आला तेव्हा दुकानदाराने त्याच्या समोर लोण्याचे वजन केले पुन्हा ते 900 ग्राम निघाले. आता दुकानदार आरडाओरडा करू लागला तू मला धोका देत आहेस माझी फसवणूक करत आहेस इत्यादी बोलू लागला.

शेतकरी म्हणाला भाऊसाहेब माझ्या जवळ वजन करण्यासाठी एक किलोचे वजनच नाही आहे. तुमच्या जवळून एक किलो गूळ खरेदी केले होते त्यालाच एक किलो आधार मानून मी वजन करतो. हे ऐकताच दुकानदार शांत झाला, कारण चुकीचे काम तर तो स्वतः करत होता. त्याला समजले आपण जसे करतो त्याचे फळ तसेच मिळते.

या लहानश्या गोष्टी मधून हे शिकण्यास मिळते कि जर आपण चुकीची कामे केली तर त्याची फळे आपल्याला आवश्य मिळतात. त्यामुळेच म्हणतात जशी करणी तशी भरणी. त्यामुळे आपल्याला चुकीची अयोग्य कामे करण्यापासून दूर राहिले पाहिजे, कारण एक दिवस आपल्या वाईट कामाची फळे आपल्याला नक्कीच मिळतात. चांगली कामे केली तर चांगली फळे मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button