astrology

या राशींच्या लोकांसाठी प्रेमाचे तीन शब्द बोलणे आहे अत्यंत कठीण

काय प्रेम करणे खरंच कठीण आहे? कदाचित नाही. पण अनेक वेळा त्यास स्वीकार करणे लोकांसाठी सोप्पे नसते. पण तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात कठीण कधी होते, जेव्हा तुम्ही प्रेम तर करता पण त्यास व्यक्त करू शकत नाहीत.

त्यांना अनेक वेळा असे करणे देखावा वाटतो. पण या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपले प्रेम व्यक्त केल्यामुळे रिलेशनशिप अधिक मजबूत पणे पुढे जाते.

कदाचित तुमच्या मित्रांच्या लिस्ट मध्ये असेही काही लोक असतील जे ‘आई लव्ह यु’ न बोलण्यामागे अजून दुसरे काही कारण देतील. कारण काहीही असो पण असे करणारे लोक आजही अस्तित्वात आहेत. आम्ही राशी अनुसार अश्या लोकांचा समूह तयार केलेला आहे.

ज्योतिष शास्त्रा अनुसार अश्या 5 राशी आहेत ज्यांना ‘आई लव्ह यु’ बोलणे कठीण वाटते. पाहू यात तुम्ही पण आहेत का या लिस्ट मध्ये.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांमध्ये दोन गोष्टी कॉमन असतात. पहिली गोष्ट ही कि त्यांना जीवना मध्ये एक्सपेरिमेंट करणे आवडते. म्हणजे त्यांना नवीन लोकांना भेटण्यास आवडते आणि मंग ते हे पाहतात कि कोणाच्या सोबत ते कम्फर्टेबल राहतील. दुसरी गोष्ट ही कि ते मित्रांच्या संबंधित काही आवश्यक अटींची लिस्ट तयार करतात. त्यांच्या लिस्ट मध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या अनेक वेळा मित्रांमध्ये मिळणे कठीण होते. हे कारण आहे कि ते प्रेम, लव्ह यासारख्या शब्दांचा वापर तो पर्यंत करत नाहीत जो पर्यंत ते स्वतः त्या बद्दल निश्चित होत नाहीत.

कन्या

होय, कन्या राशीचे लोक प्रोफेशनल असतात. ते एक गाणे लिहितील पण ते तो पर्यंत लोकांच्या समोर आणणार नाहीत जो पर्यंत ते परफेक्ट तयार होत नाही. तो दुकानातून ट्राउजर खरेदी करतील पण तो पर्यंत घालणार नाहीत जो पर्यंत त्यावर मैचिंग टॉप मिळणार नाही. ही गोष्ट त्यांच्या रिलेशनशिप बद्दल देखील लागू होते. जो पर्यंत ते मनातून दृढ पणे विचार करत नाही तो पर्यंत ते ‘आई लव्ह यु’ बोलणे योग्य समजत नाहीत.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक बदल सहजा सहजी स्वीकार करत नाहीत. ते स्थिती पाहतात आणि त्यानंतर आपल्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ शोधतात आणि त्यानंतर त्यास जोडून आपले भविष्य पाहतात. याचा अर्थ असा कि ते तो पर्यंत कोणत्याही बाबतीत निश्चित होत नाही जो पर्यंत विचार करण्यासाठी भरपूर वेळ घेत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत देखील ते भरपूर वेळ घेतात आणि तो पर्यंत ‘आई लव्ह यु’ बोलत नाहीत जो पर्यंत सगळ्या बाजूने विचार पूर्ण होत नाही.

मकर

मकर राशीचे लोक प्रॅक्टिकल, महत्वकांक्षी आणि ध्येय प्राप्तीसाठी काम करणारे असतात. मकर राशी चे लोक फक्त आणि फक्त व्यापारावर फोकस करतात. हे लोकांच्या लूक, वागणूक आणि कामाची प्रशंसा करतात. हे लोकांना आपल्या हृदयात जागा देतात. पण अत्यंत कमी बाबतीत असे होते कि बिजनेस टू बिजनेस रिलेशनशिप शिवाय हे दुसऱ्या इतर नात्यात येतात.

कुंभ

हे स्वातंत्र्य शोधतात. आणि कोणत्याही रिलेशनशिप मध्ये यांना स्वातंत्र्य मिळणे अत्यंत असामान्य आहे. यामुळे हे सुरक्षित जोन मध्ये राहणे पसंत करतात. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या जादुई तीन शब्दांचा वापर तेव्हाच करतात जेव्हा यांना स्वताच्या स्वातंत्र्याची खात्री होते किंवा यांना वाटते कि एखाद्या खास व्यक्तीच्या सोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्या बद्दल कॉम्प्रमाइज केले जाऊ शकते. यामुळे अत्यंत कमी प्रसंगी कुंभ राशीचे लोक ‘आई लव्ह यु’ बोलतात.


Show More

Related Articles

Back to top button