Connect with us

टरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फायदेशीर

Food

टरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फायदेशीर

टरबूज उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे पण याचे बीज (बिया) संपूर्ण वर्ष खाऊ शकता. या बिया खाण्यास स्वादिष्ट लागतात एवढेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर असतात. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या बियांना खाऊ शकता.

स्नैक्स टाईम दरम्यान चहाचा आस्वाद घेताना देखील तुम्ही याचे सेवन करू शकता. चला पाहू टरबूजच्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे मिळू शकतात.

डायबेटीस रुग्णांसाठी लाभदायक

उकडलेले टरबूजचे बीज डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर असतात, यामध्ये असणारे पौष्टिक गुण ब्लड शुगरची मात्रा कंट्रोल करण्याचे काम करते.

एन्टी एजिंग सारखे काम करते

टरबूज मध्ये एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण चांगले असते. एंटीऑक्सीडेंट एंटी एजिंगचे काम करते. ज्यालोकाना नेहमी तरुण दिसायचे आहे त्यांनी टरबूजाच्या बिया खाल्ल्या पाहिजे.

निरोगी हृदयासाठी

हृद्याचा आजार असणाऱ्यासाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर असतात. यामध्ये असणारे गुण ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवण्याचे काम करते. जर तुम्ही हार्ट पेशंट आहे तर टरबूजाच्या बियांना खाण्यास सुरुवात करा. काही दिवसात फायदा होईल.

केसांसाठी आणि स्किनसाठी फायदेशीर

टरबूजाच्या बियांमध्ये Lycopene नावाचे तत्व असते, जे केस आणि त्वचेला चमकदार बनवते.

मैग्नीशियमची कमी पूर्ण होते

जेव्हाही शरीरामध्ये मैग्नीशियमची कमी होईल तेव्हा टरबूजाच्या बियांचे सेवन सुरु करा. यामध्ये भरपूर प्रमाणात मैग्नीशियम असते.

वजन कमी करण्यासाठी मदत

टरबूजचे बीज वजन कमी करण्यासाठी मदत करतात. यांच्यामध्ये नाममात्र कैलोरी असते. त्यामुळे वेगाने वजन घटवण्यासाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर असतात. तुम्ही यांना स्नैक्स टायम मध्ये चहा सोबत खाऊ शकता किंवा चालताफिरता देखील खाऊ शकता. यामध्ये असलेले डायट्री फाइबर पचन क्रिया चांगली करण्यास मदत करतो आणि पचन संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.

जॉन्डिस पासून सुरक्षा

जॉन्डिस सारख्या समस्या झाल्यास टरबूजाच्या बिया सेवन करणे फायदेशीर ठरते. याच सोबत संक्रमणापासून वाचवण्यासाठी मदत होते.

किडनी स्टोन पासून बचाव

टरबूज बियांपासून बनणारी चहा नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही किडनीच्या समस्ये पासून वाचू शकता. किडनी स्टोन किंवा मुतखडा झाल्यास देखील फायदेशीर आहे.

 

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top