Uncategorized

चहा बनवल्या नंतर चुकूनही कचऱ्यात फेकू नका चहापत्ती, हे आहेत याचे फायदे

चहाच्या चाहत्यांना आज एक महत्वाची गोष्ट सांगत आहोत. चहा एक असे पेय आहे ज्यास जवळपास सगळे पसंत करतात. पण चहाच्या बद्दल अनेक गैरसमजुती देखील आहेत. अनेक लोक चहा गाळल्या नंतर उरणारी चहा पत्ती कचऱ्यात फेकून देतात. पण अत्यंत कमी लोकांना माहीत आहे कि चहासाठी वापरलेली ही चहापत्ती पुन्हा काही कामांसाठी वापरली जाऊ शकते. तर चला पाहू चहापत्ती फेकण्याच्या ऐवजी त्याचा पुन्हा वापर कसा आणि कोठे केला जाऊ शकतो.

असे करू शकता चहापत्तीचा पुन्हा वापर

सगळ्यात पहिले चहा बनवल्या नंतर उरलेल्या चहापत्तीला फेकण्याच्या ऐवजी व्यवस्थित स्वच्छ करावी. चहापत्ती अशी स्वच्छ करा की त्यामधून साखरेचा गोडवा निघून जाईल. त्यानंतर आपण ही चहापत्ती वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकतो.

सगळ्यात पहिला फायदा म्हणजे उरलेल्या चहापत्तीचा वापर आपण स्वच्छ केल्या नंतर कंडिशनर म्हणून करू शकतो. कंडिशनर म्हणून चहापत्ती वापरण्यासाठी चहापत्ती पुन्हा एकदा पाण्यात उकळावी आणि यानंतर आपले केस या पाण्याने धुवावेत.

उरलेल्या चहापत्तीचा दुसरा वापर म्हणजे तुम्ही आपल्या घरातील भांडी साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला चहापत्ती आपल्या भांडे घासण्याच्या पावडर मध्ये मिक्स करावी लागेल. यामुळे भांड्याना चमक येईल आणि सफाई चांगली होईल.

ज्या चहापत्तीला तुम्ही आता पर्यंत कचऱ्यात फेकत होते त्यास तुम्ही खत म्हणून वापरू शकता. हे रोपटयांसाठी खत म्हणून चांगले काम करते.

हे आहेत उरलेल्या चहापत्तीचे इतर फायदे

चहापत्ती मध्ये एंटीऑक्सीडेन्ट असते. जे जखम झाल्यास फायदेशीर ठरू शकते. यासाठी चहापत्तीच्या पाण्याने आपली जखम स्वच्छ करा. असे केल्याने जखम लवकर भरण्यास मदत होते.

चहापत्ती माश्यांपासून सुटका देण्यास मदत करते. जर आपल्या घरामध्ये माश्या त्रास देत असतील तर त्यापासून वाचण्यासाठी उरलेली चहापत्ती एका बादली मध्ये टाकून पूर्ण घर पुसून घ्या. माश्याचा त्रास कमी होईल.

जर तुम्ही काबुली चणे बनवणार असाल तर त्यासाठी देखील चहापत्ती वापरू शकता. यासाठी चहापत्तीची पोटली बनवा आणि त्यास एका भांड्यात चण्या सोबत उकळवा, यामुळे पदार्थ स्वादिष्ट होईल.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा वापर प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

Tags

Related Articles

Back to top button