foodhealth

वात दोष दूर करण्यासाठी रामबाण उपाय

आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे बहुतेक आजार हे वात, कफ आणि पित्त दोष कारणामुळे होतात. आयुर्वेदा मध्ये या 3 तत्वांना आपल्या आरोग्याचा आधार मानले गेले आहे. याच्या अनुसार डोक्या पासून ते छाती पर्यंतचे आजार हे कफ बिघडल्याने होते. छाती पासून ने पोट आणि कंबरे पर्यंत होणारे आजार पित्त बिघडल्याने होतात. आणि कंबरे पासून ते गुडघे आणि पायाच्या शेवटा पर्यंत होणारे रोग हे वात बिघडल्यामुळे होतात.

वात दोष काय आहेत?

जेव्हा शरीरातील वायू तत्व सामान्य पेक्षा जास्त होतो तेव्हा त्यास वात दोष म्हंटले जाते. सामान्य पणे वात संध्याकाळी किंवा रात्री वाढतो. जर एखादा आजार तुमच्या शरीराला संध्याकाळी किंवा रात्री उशिरा त्रास देत असेल तर त्या आजाराचे कारण वात दोष आहे. वजन वाढण्याचा त्रास देखील वात दोषा मुळे होतो. वात दोषमुळे अनेक लोकांच्या शरीराला खाणेपिणे लागत नाही आणि शरीर सुकायला लागते. साधारणपणे पायाच्या टाचांच्या मध्ये भेगा पडणे, केसांमध्ये डैंड्रफ, नाजूक दातांच्यामुळे दात दुखणे, घाबरणे, वाईट स्वप्न वात दोष झाल्यामुळे होतात.

कुठे असतो वात?

शरीरामध्ये वातचे स्थान आहे पोटामधील मोठे आतडे. यामुळे वात दोष झाल्यावर अनेक वेळा रुग्णाचे पोट फुगते आणि पोटामध्ये कडक पणा वाटतो. याच सोबत तोंडातून लाळ टपकने, भूक न लागणे, जीव घाबरणे, जांभई येणे, थकवा वाटणे, शरीर थरथरणे, पोटा मध्ये गुडगुड इत्यादी वात दोष होण्याची लक्षण आहेत.

त्रिफळा दूर करतो वात दोष

वात दोषावर त्रिफळा सर्वात प्रभावी आणि विश्वसनीय उपचार मानला जातो. हे फळ बद्धकोष्ठता मध्ये फायदेशीर आहे. तुम्ही त्रिफळा चहा किंवा त्रिफळा 1/4 चमचा, अर्धा चमचा कोथिंबीर, 1/4 चमचा इलायची दाणे बारीक करून घ्या आणि यास दिवसातून दोन वेळा घ्या.

त्रिफळा सेवन करण्याचे इतर फायदे

त्रिफळा नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

त्रिफळा नियमित सेवन केल्यामुळे दीर्घकाळा पर्यंत आजारा पासून दूर राहता येते.

त्रिफळा आणि याचे चूर्ण वात, कफ आणि पित्त दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.

केस खराब होते आणि अवेळी पांढरे होण्या पासून त्रिफळा सेवन केल्यामुळे वाचता येते.

सकाळच्या वेळी फ्रेश होऊन रिकाम्या पोटी ताज्या पाण्याच्या सोबत त्रिफळा सेवन करा आणि यानंतर एक तास पाण्याच्या शिवाय काहीही घेऊ नये.

त्रिफळा सेवन करण्याच्या अगोदर एखाद्या अनुभवी वैद्याचा सल्ला घ्या ज्यामुळे त्रिफळाचा सर्वोत्तम फायदा तुम्हाला मिळेल.

नेहमी वातावरणा प्रमाणे त्रिफळा सेवन केले पाहिजे. म्हणजेच वातावरण पाहून त्रिफळा सोबत गुळ, सेंधव मीठ, सुंठ चूर्ण इत्यादी मिक्स करून सेवन केले पाहिजे.


Show More

Related Articles

2 Comments

    1. तुमच्या डॉक्टर किंवा वैद्या सोबत याविषयी चर्चा करा तुमची समस्या आणि त्यावरील समाधान ते अधिक जास्त चांगल्या स्वरूपात देऊ शकतात.

Back to top button