astrologydharmik

स्वास्तिक उलटा काढावा का सरळ? काय आहेत याचे फायदे…

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असतेच जी पूर्ण करण्यासाठी तो अथक प्रयत्न करत असतो. सनातन धर्मामध्ये असे अनेक उपाय आहेत ज्यांना केल्यामुळे आपल्या अथक परिश्रमास नशिबाची सोबत मिळू शकते आणि आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होऊ शकतात.

यापैकीच एक उपाय आहे स्वास्तिकचा. स्वास्तिक हा शब्द संस्कृतचे दोन शब्द सु आणि अस्ति यांनी बनला आहे ज्याचा अर्थ शुभ असो, कल्याण असो असा होतो. हिंदू धर्मा मध्ये स्वास्तिकचे महत्व आहे. जेव्हा पूजापाठ किंवा शुभ कार्य करायचे असेल तेव्हा स्वास्तिक काढले जाते. स्वास्तिक धनाची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता गणपती यांचे प्रतिक आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार स्वास्तिकचे काही वेगवेगळे वापर सांगितले आहेत. ज्यांचा वापर करून आपण आपल्या जीवना मधील सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवू शकतो आणि धन, सुख समृद्धी सोबतच माता लक्ष्मीची कृपा मिळवू शकतो.

स्वास्तिकचा लाभ हा सरळ नाही तर उलटा स्वास्तिक बनवल्याने होतो. जर आपण उलटा स्वास्तिक काढला तर यामुळे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतील. येथे काही स्वास्तिक संबंधीचे उपाय आपण जाणून घेऊ.

स्वास्तिक बनवण्याचे फायदे

जर आपल्याला आपल्या व्यापारामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या व्यापारामध्ये वाढ करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी घराच्या उत्तर पूर्व दिशेला गंगाजल शिंपडून तेथे हळदीने स्वास्तिक बनवावा. स्वास्तिकची विधी-विधान पूर्वक पूजा करून गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्याला हा उपाय लागोपाठ सात गुरुवार करायचा आहे. यामुळे आपल्या व्यापारामध्ये लवकरच फायदा मिळण्यास लागेल.

जर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असावी अशी इच्छा असेल तर घराच्या बाहेर रांगोळी सोबत कुंकूने स्वास्तिक काढावे. आपण असे केल्यास देवीदेवता प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये वास करतात. घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा होते.

जर आपल्याला आपली कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर घरातील पूजास्थानी किंवा मंदिरात स्वास्तिक बनवून त्यावर पाच धान्य ठेवून दिवा लावावा. आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील या व्यतिरिक्त घरातील पूजास्थानी किंवा देवघरात स्वास्तिक काढून त्यावर आपल्या इष्ट देवतेची प्रतिमा ठेवून पूजा करावी यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते.

आपल्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतील तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी घराच्या उत्तर पूर्व दिशेला हळदीने स्वास्तिक काढावा. यामुळे घर परिवारामध्ये सुख शांती राहते आणि घरात असलेले वादविवाद दूर होतात.

वरील स्वास्तिकचे उपाय केल्यामुळे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असलेल्या समस्या दूर करू शकतो आणि लक्ष्मी कृपा मिळवू शकतो. तसेच देवी देवतांच्या कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो.


Tags
Show More

Related Articles

Back to top button