शनी कृपा मिळवण्यासाठी या उपायांना आवश्य करून पहा, शनी महाराज देतील शुभ फल

आपल्या सगळ्यांना माहीत आहेच कि शनिवारचा दिवस हा शनी देवाचा मानला जातो. या दिवशी अनेक लोक शनीदेवाची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्याचे शक्य  करतात. या दिवशी बरेचसे लोक शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय देखील करतात ज्यामुळे शनिदेव त्यांच्यावर प्रसन्न होऊ  जीवनातील सगळ्या समसया दूर होऊ शकतील. आपल्या माहितीसाठी शनिवार, शनी अमावास्या आणि शनी प्रदोष यादिवशी शनीदेवाला प्रसन्न केले जाऊ शकते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये शनीमुळे वाईट फळ मिळत असेल तर अश्या स्थिती मध्ये आज आम्ही  उपाय सांगत आहोत ज्यांना आपण केले तर यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहील. आपण या उपायांना एकदा अवश्य करून पाहावेत. यामुळे आपल्याला लाभ आवश्य मिळेल.

शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी या उपायांना अवश्य करा

शनिवारच्या दिवशी आपण दोन्ही वेळच्या भोजना मध्ये काळे मीठ आणि काळी मिरी यांचा वापर केला पाहिजे.

जर आपण शनिवारच्या दिवशी माकडांना भाजलेले चणे खाण्यास दिले आणि गोड पोळीवर तेल लावून काळ्या कुत्र्याला दिली तर यामुळे शनिदेव प्रसन्न होतील.

जर एखाद्या व्यक्तीवर शनीदेवाचा वाईट प्रभाव असेल तर अश्या स्थिती मध्ये त्या व्यक्तीने मांसाहार आणि मद्य सेवन बंद केले पाहिजे.

शनिदेवाच्या दुष्प्रभावा पासून सुटका मिळवण्यासाठी दररोज पूजा करताना महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

जर एखाद्या व्यक्तीवर शनीची साडेसाती सुरु असेल तर अश्या स्थिती मध्ये शुक्रवारच्या रात्री 800 ग्राम काळे तीळ पाण्यामध्ये भिजवा आणि शनिवारी सकाळी त्यांना वाटून बारीक करावे आणि त्यामध्ये गूळ मिक्स करून लाडू बनवा आणि या एखाद्या काळ्या घोड्यास खाण्यास द्यावे, हा उपाय आपल्याला आठ शनिवार करा. यामुळे शनीची साडेसाती दूर होईल.

जर आपण पिंपळाच्या झाडाला गोड जल अर्पित केले आणि राईच्या तेलाचा दिवा लावून अगरबत्ती लावली तर यामुळे शनीची साडेसातीचा प्रभाव दूर होतो. आपण हनुमान चालीसा, शनी चालीसा आणि भैरव चालीसा पठण करू शकता. यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव दूर होईल.

वर आम्ही काही सोप्पे उपाय सांगितले आहेत ज्यांना आपण करून पाहू शकता. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा नेहमी राहील. जसे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच कि शनिदेव हे कर्माची फळे देतात आणि आपली जशी कर्म असतील तशी फळे शनी देव देतात. जर यांची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली तर खराब नशीब देखील चमकू शकते आणि व्यक्ती प्रगती करू शकतो. त्यामुळे शनिदेवाची कृपा करण्यासाठी हे उपाय आपण करू शकता.