horoscope

मंगळवार 28 ऑगस्ट : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील परीक्षेचा, तर 3 राशीसाठी चांगला

आज मंगळवार 28 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. मुलांशी असणारे मतभेद वादविवादाला निमंत्रण देतील आणि नैराश्य निर्माण करु शकतील. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. काळजी करण्याचा दिवस – तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. तुमचा मूड खराब असल्यामुळे तुम्ही कार्यालयात कदाचित वादग्रस्त असू शकाल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. प्रेम आशेचा किरण दाखवेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आज कुटूंबातील एखादा सदस्य तुमची चिंता वाढवेल – परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर काही मर्यादा ठरवून घ्या आणि त्यानुसार वागा. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे.

कन्या राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा लकी नाही त्यामुळे बोलताना काळजी घ्या – कारण तुमचे सहज संभाषणही तुमच्या दिवसभराच्या कामकाजावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकेल. त्यामुळे वादावादी आणि तणावाचे क्षण येण्याची शक्यता आहे. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

तुल राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रियकरा/प्रियसीकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.

धनु राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

कामकाजाच्या ठिकाणच्या तणावामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. तुम्हाला असं वाटेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही आहेत, पण हा केवळ नकारात्मक विचार आहे. शक्य तेवढे सकारात्मक राहण्याचा विचार करा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

मकर राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

भावनिकदृष्ट्या तुम्ही बेभरवशाचे आणि तुम्हाला नेमके काय हवे त्याबाबत चंचल मनोवृत्तीचे आहात. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

मीन राशी भविष्य (Tuesday, August 28, 2018)

काहीही झाले तरी आपल्या मनाची शांतता संयम ढळू देऊ नका, नाहीतर त्यामुळे आपल्या घरात कायमस्वरूपी फूट पडेल. शांत डोक्याने प्रयत्न केलात तर घरात सुख समाधान शांतता नांदू शकेल, दुभंगलेले घर कधीच प्रगती करू शकत नाही. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. घरगुती कर्तव्ये टाळणे आणि पैशावरून भांडण करण्यामुळे तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा आनंद आज गमावून बसाल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती आणि मूड याचा तुमच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.


Show More

Related Articles

Back to top button