Connect with us

शनिवार 08 डिसेंबर : आज या तीन राशींना होणार फायदा तर दोन राशींना येतील समस्या

Today's Horoscope

शनिवार 08 डिसेंबर : आज या तीन राशींना होणार फायदा तर दोन राशींना येतील समस्या

आज शनिवार 08 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.

वृषभ राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

मिथुन राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

कर्क राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

सिंह राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

कन्या राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि नातेवाईक मदत करतील, त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी रहाल. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा/उभी राहणार नाही.

तुल राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आता गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.

धनु राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.

मकर राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा/तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल.

मीन राशी भविष्य (Saturday, December 08, 2018)

गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top