Connect with us

सोमवार 3 सप्टेंबर : आज शंकर भगवान या 3 राशीवर राहतील प्रसन्न, तर 4 राशीसाठी सामान्य दिवस

Today's Horoscope

सोमवार 3 सप्टेंबर : आज शंकर भगवान या 3 राशीवर राहतील प्रसन्न, तर 4 राशीसाठी सामान्य दिवस

आज सोमवार 3 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. अनेक दिवस प्रलंबित असणाºया निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.

मिथुन राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. अंतिमत: आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल, पण आज तुम्ही सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणा-यांना तुम्ही मदत कराल. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. तुमचा द्वेष करणारी माणे आज तुम्हाला अधिक त्रासदायक भासू शकतील, ज्यामुळे तुमचा आक्रमकपणा वाढेल. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

कर्क राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे! परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

सिंह राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

काहीही झाले तरी आपल्या मनाची शांतता संयम ढळू देऊ नका, नाहीतर त्यामुळे आपल्या घरात कायमस्वरूपी फूट पडेल. शांत डोक्याने प्रयत्न केलात तर घरात सुख समाधान शांतता नांदू शकेल, दुभंगलेले घर कधीच प्रगती करू शकत नाही. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवला नाहीत – तर घरात समस्या उद्भवू शकते. आज तुमची प्रिय व्यक्ती अडचणीत असण्याची शक्यता आहे. तुमच्या उतावीळपणावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुम्ही चांगली मैत्री संपुष्टात आणाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.

कन्या राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

तुल राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तूटू शकते. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आज तुमचे तुमच्या जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून भांडण होईल.

धनु राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

मकर राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेमसंबंधामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रमाणापेक्षा अधिक सक्तीने वागत आहेत, असे तुम्हाला वाटेल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. वैवाहिक आयुष्याची नकारात्मक बाजू आज कदाचित तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे.

कुम्भ राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत – संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा – तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही निराश असाल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.

मीन राशी भविष्य (Monday, September 03, 2018)

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top