दिवाळी मध्ये घर सजवताना चुकूनही करू नका या 3 वस्तूंचा वापर, नाहीतर घरी येणार नाही माता लक्ष्मी

दिवाळी जशी जवळ येत चाललेली आहे तशी आपल्या घराची सफाई आणि सजावट या कामांमध्ये वेग आलेला असेल कारण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपले घर स्वच्छ आणि सुंदर दिसले पाहिजे अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. कारण दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो. यामुळे आपण आपल्या घराची रंगरंगोटी, सफाई आणि सजावट करून घर नव्या सारखे चमचम करण्याचा प्रयत्न करतो. घराची सजावट करण्यासाठी बाजारामधून वेगवेगळ्या नवीन वस्तू खरेदी देखील करतो. ज्यामुळे आपले घर सुंदर दिसावे हि आपली इच्छा आणि हौस दोन्ही पूर्ण करून घेतो.

पण अत्यंत कमी लोकांना माहीत आहे कि दिवाळी मध्ये काही खास वस्तूंचा सजावटीसाठी वापर करणे अशुभ मानले जाते. या वस्तूंमुळे अपशकुन होऊ शकतो किंवा निगेटिव्ह एनर्जी घरा मध्ये पसरू शकते. जर असे झाले तर माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत नाही. त्यामुळे अत्यन्त आवश्यक आहे कि आपण दिवाळीची सजावट करताना काही खास वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. चला तर जाणून घेऊ याबद्दल अधिक माहिती.

चामड्याच्या वस्तू : काही सजावट करण्याच्या वस्तू चामड्याच्या बनलेल्या असू शकतात किंवा त्या वस्तू मध्ये काही प्रमाणात चामडे वापरून त्याची सजावट केलेली असू शकते. अश्या वेळी जर आपण चामड्याचा वापर करून बनलेली वस्तू किंवा चामड्या अंश असलेली वस्तू दिवाळी मध्ये घराची सजावट करण्यासाठी वापरू नये. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते. तसेच दिवाळीत पूजा करताना आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा कि आपण चामड्याचे बेल्ट, पर्स इत्यादी चामड्याच्या कोणत्याही वस्तू जवळ ठेवून माता लक्ष्मीची पूजा करू नये.

काळा रंग : दिवाळी मध्ये काळा रंग वापरणे कोणत्याही परिस्थिती मध्ये टाळले पाहिजे. मंग आपण भिंतीवर रंग लावा किंवा रांगोळी मध्ये किंवा लाइटिंग मध्ये काळा रंग जेवढे शक्य असेल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. सजावटचे सामान खरेदी करताना देखील काळजी घ्या कि त्यावस्तू मध्ये काळ्या रंगाचा कमीत कमी वापर केलेला असेल. आपल्याला माहीत असेलच कि काळा रंग हा निगेटिव्हिटी चे प्रतीक असते ज्यास दिवाळी मध्ये आपल्या घरात नसले पाहिजे.

खराब फुले : दिवाळी मध्ये माता लक्ष्मीची पूजा करताना फुले नेहमी ताजी म्हणजेच फ्रेश वापरावी. खराब सडलेली फुले वापरू नयेत. अनेक वेळा लोक पैसे वाचवण्याच्या उद्देशाने खराब किंवा शिळी फुले बाजारातून खरेदी करतात आणि ती फुले देवाला अर्पण करता. पण आपल्या माहितीसाठी अशी शिळी आणि खराब झालेली फुले उदासीनता आणि नेगेटिव्हिटी पसरवतात. अश्या गोष्टी माता लक्ष्मीला आवडत नाहीत आणि माता लक्ष्मी अशी निगेटिव्हिटी असलेल्या घरात प्रवेश करणे पसंत करत नाही.