celebritiesentertenment

बॉलीवूड फिल्म मध्ये दिसलेले हे टीव्ही वरील सुपरस्टार, पण कोणी ओळखले देखील नाही

बॉलीवूडच्या दुनिये मध्ये दररोज अनेक लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. पण अत्यंत कमी लोक यशस्वी होतात. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान देखील एक असाच कलाकार आहे जो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून मुंबई आलेला. शाहरुख खानने आपल्या करियरची सुरुवात टीव्हीवरून केली होती आणि त्यानंतर त्याने यशाची शिखरे पादाक्रांत केली. पण शाहरुख सारखे नशीब सगळ्यांचे नाहीत.

आजच्या काळातील अनेक टीव्ही कलाकारांनी आपले नशीब बॉलीवूड मध्ये आजमावण्यासाठी प्रयत्न केले त्यामधील काही लोकांना संधी देखील मिळाली पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. ते कोणत्या चित्रपटा मध्ये दिसले हे देखील कोणाला समजले नाही. कारण फिल्म मध्ये मोठे कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडे कोणाचे साधे लक्ष देखील गेले नाही. या पोस्ट मध्ये आपण काही असे कलाकार पाहू ज्यांनी बॉलीवूड फिल्म्स मध्ये काम तर केले पण लोकांच्या नजरेत ते आलेच नाहीत.

सुमोना चक्रवर्ती

‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ मध्ये कपिल सोबत दिसणारी सुमोना चक्रवर्ती सुपरहिट फिल्म ‘बर्फी’ मध्ये होती. या चित्रपटा मध्ये तिने इलियाना डिक्रुजच्या मैत्रिणीची भूमिका केली होती.

रश्मी देसाई

रश्मी देसाई टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने सुपरहिट सिरीयल ‘उतरन’ मध्ये तपस्याची भूमिका केली होती. फिल्म ‘दबंग 2’ मध्ये ‘दगाबाज’ गाण्यामध्ये रश्मी देसाई होती पण कदाचित कोणी तिच्याकडे लक्ष दिले नाही.

करण वाही

करण वाही टीव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याने अनेक सुपरहिट सिरीयल मध्ये काम केलेले आहे. काही काळा पूर्वी आदित्य चोपडा आणि परिणीती चोपडा यांचा चित्रपट ‘दावत-ए-इश्क’ आलेला आणि या चित्रपटा मध्ये करण वाही होता. या चित्रपटाचे गाणे ‘शायराना’ मध्ये करण वाही परिणीती सोबत रोमान्स करत होता.

मौनी रॉय

सगळ्यांना वाटते कि टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेत्री मौनी रॉयने फिल्म ‘गोल्ड’ मधून डेब्यू केला आहे. पण तुमच्या माहितीसाठी तिने फिल्म ‘गोल्ड’ मधून डेब्यू करण्या अगोदर बॉलीवूड मध्ये तिने काम केले आहे. फिल्म ‘रन ‘ मधील गाणे ‘नही होना नही होना’ मध्ये मौनी दिसली होती.

जेनिफ़र विंगेट

जेनिफ़र विंगेट देखील टीव्हीवरील अत्यंत प्रसिध्द अभिनेत्री आहे. जेनिफ़र विंगेटने बॉलीवूड मध्ये डेब्यू ‘लव किया और लग गयी’ मध्ये केला होता पण फिल्म फ्लॉप झाल्यामुळे तिला प्रसिद्धी नाही मिळाली.

करण टेकर

करण टेकर टीव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकार आहे. याने शाहरुख आणि अनुष्का यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ मध्ये काम केले होते. फिल्म मधील गाणे ‘चलते-चलते’ मध्ये करण टेकर होता. पण शाहरुख समोर असल्यावर लोक इतर सगळ्यांना इग्नोर करतात.

संजिदा शेख

संजिदा शेख फिल्म ‘बागबान’ मध्ये एका लहानश्या रोल मध्ये दिसली होती. पण तिला काही विशेष यश मिळाले नाही. हे यश तिला टीव्हीवर मिळाले.

सना खान

सना खान बिग बॉस मध्ये एक स्पर्धक म्हणून आलेली. या शो मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. सना फिल्म ‘जय हो’ मध्ये होती. या चित्रपटा मध्ये तिने डैनी च्या मुलीची भूमिका केली होती.

करण पटेल

करण पटेल ने सिरीयल ‘मोहब्बते’ मध्ये केलेला ‘रमन’ची भूमिका प्रसिद्ध झालेली. करण ने फिल्म  ‘सिटी ऑफ गोल्ड’ मधून बॉलीवूड मध्ये डेब्यू केलेला पण फिल्म सुपरफ्लॉप झाली.

 

Related Articles

Back to top button